Drishyam 2 Collection : ‘दृश्यम 2’ ची छप्परफाड कमाई, लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश | पुढारी

Drishyam 2 Collection : 'दृश्यम 2' ची छप्परफाड कमाई, लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘दृश्यम २’ (Drishyam 2 Collection) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली होती. अजय देवगन स्टारर चित्रपटाने पाचव्या दिवशीही दमदार कलेक्शन केलं आहे. हा चित्रपट १०० कोटींच्या कल्बमध्ये समाविष्ट होण्याच्या अगदीजवळ आहे. अजय देवगण स्टारर ‘दृश्यम 2’ पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. सस्पेन्स-क्राईम थ्रिलर १८ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘दृश्यम २’ रिलीज होऊन ५ दिवस झाले असून, या चित्रपटाने आतापर्यंत आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटात अजय देवगणशिवाय तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊया. (Drishyam 2 Collection)

‘दृश्यम २’ ने ५ व्या दिवशी केली इतकी कमाई

‘दृश्यम २’ रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात यशस्वी ठरला आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी ‘दृश्यम २’ ने १५.३८ कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, चित्रपटाचे कलेक्शन दुसऱ्या दिवशीही उत्कृष्ट होते. त्यावेळी २१.५९ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी २७.१७ कोटींची कमाई केली. दुसरीकडे, चौथ्या दिवशीही चित्रपट चांगले कलेक्शन करण्यात यशस्वी ठरला. त्यावेळी ११.८७ कोटी रुपयांची कमाई केली. त्याचबरोबर चित्रपटाची पाचव्या दिवसाची कमाईही चांगली झाली आहे. ‘दृश्यम २’ ने ५ व्या दिवशी १०.४८ कोटी रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाची एकूण कमाई ८६.४९ कोटींवर गेली आहे.

‘दृश्यम २’ चे कलेक्शन

पहिला दिवस- १५.३८ कोटी रुपये
दुसरा दिवस- २१.५९ कोटी रुपये
तिसरा दिवस- २७.१७ कोटी रुपये
चौथा दिवस- ११.८७ कोटी रुपये
पाचवा दिवस- १०.४८ कोटी रुपये
एकूण कलेक्शन- ८६.४९ कोटी रुपये

‘दृश्यम २’ हा २०१५ रोजी आलेल्या ‘दृश्यम’ चा पुढील भाग आहे. ‘दृश्यम २’ हा ५० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. पण, चित्रपटाची पाच दिवसांची कमाई बजेटच्यादेखील खूप पुढे गेली आहे. हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मर्डर मिस्ट्री थ्रिलरमध्ये अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकर बनला आहे. तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांनीही या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. हिंदीमध्ये रिलीज झालेले ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ हे मल्याळम भाषेत त्याच नावाने बनवलेल्या चित्रपटांचे रिमेक आहेत.

हेही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

Back to top button