priyanka chopra : अखेर प्रिकनिकच्या बाळाची झलक आली समोर... (photo) | पुढारी

priyanka chopra : अखेर प्रिकनिकच्या बाळाची झलक आली समोर... (photo)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनसच्या बाळाची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण, ज्या-ज्यावेळी प्रियांकाने आपल्या मुलीचा फोटो शेअर केला होता, त्यामुध्ये तिचा चेहरा लपवलेला दिसला. आता बाळाची झलक समोर आली आहे. क्युट मालतीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (priyanka chopra)

प्रियांका सध्या आपल्य़ा बाळाचे संगोपन करण्यात बिझी आहे. सध्या ती तिची मुलगी मालतीसोबत टाईम स्पेंड करताना दिसली आहे. नुकतेच प्रियांकाने तिच्या लेकीचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये क्यूट मालतीच्या डोक्यावर लोकरी टोपी दिसत असून ती झोपलेली दिसते.

या फोटोत मालतीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचं स्वेटर आणि गुलाबी टोपी आहे. तिच्याभोवती सुंदर शाल आहे. टोपीमुळे बाळाचा चेहरा पूर्ण दिसत नसला तरी अर्धा दिसत आहे. तरी तिचे पिंकी ओठ या फोटोत दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना प्रियांकाने ‘i mean’ अशी कॅप्शन लिहिली आहे.

यापूर्वी प्रियांकाने तिच्या मुलीचा चेहरा हार्ट इमोजीने लपवलेला होता. सर्वच चाहते उत्सुक होते की, नेमकी प्रिकनिकची मुलगी दिसते तरी कशी? अखेर फोटो व्हायरल झाल्याने चाहते तर खुश आहेतचं. शिवाय ते कमेंटमध्ये गोड शुभेच्छादेखील देत आहेत.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

Back to top button