Money laundering case: माजी मंत्री अनिल देशमुखांच्या मुलाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे

पुढारी ऑनलाईन: Money laundering case : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून ईडी कोठडीत आहेत. याप्रकरणात त्यांचा मुलगा ऋषिकेश हा देखील आरोपी आहे. त्याला अनेकवेळा ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आला होता, मात्र ऋषिकेश यांनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यासाठी अर्ज केला आहे.
Money laundering case | Son of former Maharasthra Home Minister Anil Deshmukh, Rishikesh withdrew his anticipatory bail application today. He is an accused in the case and never appeared before ED despite summoning by the agency.
— ANI (@ANI) November 22, 2022
Money laundering case : माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात अनेकवेळा जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. परंतु न्यायालयाकडून वारंवार त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हे देखील आरोपीच्या यादीत आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. म्हणून ऋषिकेश यांनी त्यापूर्वीच अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
मात्र आता ऋषिकेश यांनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्याने या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येणार असल्याचे दिसत आहे. यापूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणात ऋषिकेश यांना ईडीकडून अनेकवेळा समन्स बजावण्यात आला होता. मात्र, आत्तापर्यंत ते कोणत्याही चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत.
हेही वाचा:
- अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला, जामिनावर २४ नोव्हेंबरला सुनावणी
- अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच, कारागृहातील मुक्काम वाढला!
- मुंबई : अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढणार?