Bhediya : ‘भेडिया’चा ट्रेलर झळकला बुर्ज खलीफावर; बुकींग सुरू

Bhediya
Bhediya

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अभिनेता वरुण धवन यांचा आगामी 'भेडिया' (Bhediya) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यास आता आठवडा शिल्लक आहे. दोन्ही स्टार्स चित्रपटाच्‍या प्रमोशनमध्ये व्‍यस्‍त आहेत. नुकतेच 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर दुबईतील सर्वात प्रसिद्ध इमारत बुर्ज खलीफावर झळकला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि वरुणने त्याच्या इंन्स्टाग्रामवर 'भेडिया' ( Bhediya ) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. यात दुबईतील सर्वात प्रसिद्ध इमारत बुर्ज खलीफावर चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळतोय. या कार्यक्रमात क्रिती सोनेरी रंगाच्या वनपीसमध्ये तर वरून ब्ल‌ॅक रंगाच्या कोटमध्ये हॅडसम दिसतोय. बुर्ज खलिफावर ट्रेलर झळकल्याने चाहत्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

रिपोर्टनुसार, 'भेडिया' चित्रपट २D आणि २D मध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत सर्वत्र चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. थ्रीडीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने यूए प्रमाणपत्र जाहीर केलं आहे. यानंतर चित्रपटाच्या  ॲडव्हान्स बुकींगला सुरूवात झाली आहे. हा चित्रपट येत्या २५ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे.

'भेडिया' चित्रपटापूर्वी वरुण धवन 'जुग जुग जिओ' चित्रपटात दिसला होता. तर क्रिती सेनॉन 'बच्चन पांडे' आणि 'हम दो हमारे दो' या चित्रपटात दिसली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news