अभिनेत्री कनिष्काचा धक्कादायक खुलासा, ‘लिव्ह इन’मध्‍ये असताना लग्नाबद्दल विचारंल आणि…; | पुढारी

अभिनेत्री कनिष्काचा धक्कादायक खुलासा, 'लिव्ह इन'मध्‍ये असताना लग्नाबद्दल विचारंल आणि...;

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्‍लीतील  श्रद्धा वालकर हत्‍या प्रकरणाची देशभरात चर्चा आहे.  या प्रकरणाच्‍या तपासादरम्यान श्रद्धाच्या बॉयफ्रेड आफताबकडून  नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणामुळे लिव्ह इन रिलेशनशिपचाही विषय चर्चेत आला आहे. दरम्‍यान, ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्री कनिष्का सोनीने या घटनेबद्दल दुख व्यक्त करून स्वत: देखील या परिस्‍थितीमधून गेल्‍याचा धक्कादायक खुलासा केला आहे. ( लिव्ह इन रिलेशनशिप )

कनिष्का सोनीने म्‍हटलं आहे की, ‘श्रद्धा वालकरचे दु:ख मी समजू शकते. कारण मी काही दिवसांपूर्वी या परिस्‍थितीचा सामना केला आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर मला स्वत: अनुभवलेली घटना आठवत आहे. मला एका अभिनेत्याने लग्नासाठी विचारलं होते. जेव्हा आम्ही लिव्ह इन इन रिलेशनशिपमध्ये होतो. याच दरम्यान मला त्याचा राग, हिंसक स्वभाव आणि ड्रिंकिंग हॅबिट सहन कराव्या लागल्या होत्या. परंतु, मला वाटत होतं की,  लग्नानंतर तो सुधारेल. याच दरम्यान जेव्हा मी एक दिवस त्याला लग्न कधी करायचं असं विचारलं तेव्हा त्याला माझा राग आला आणि त्याने त्या रात्री त्याने मला खूप मारले होते.’

लिव्ह इन इन रिलेशनशिपमध्ये असताना मी जास्तीत- जास्त वेळ त्याच्याच घरीच असायचे. तेव्हा तो मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सांगायचा; परंतु याला माझ्या कुटुंबाचा विरोध होता.  मलादेखील त्याच्यासोबत ‘लिव्ह इन’ मध्ये राहायचे नव्हते. मी त्याच्यासोबत होते कारण, मला आमचं लग्न होईल, अशी मला अपेक्षा होती. पहिल्यांदा त्याने लग्न करणार असल्याचे सांगितले; परंतु नंतर त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारताच त्‍याने मला मारहाण केली. यामुळे मला त्याची भीती वाटली. त्याच रात्री मी माझे तेथून पळून आले. प्रेमामध्ये मुलांचे मी नेहमी हेच रूप पहिले जात आहे. असे कनिष्का सोनीने म्‍हटले आहे.

तोपर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेऊ नका

अभिनेत्री कनिष्काने सर्व मुलींना सल्ला दिला आहे की, जरी देशातील परिस्थिती बदलली असली तरी जोपर्यंत तुम्ही त्या मुलाला पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेऊ नका. किंवा त्याच्यासोबत राहू नका. वाईट मानसिकतेच्या व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा मुलींनी एकटे राहावे कधीही चांगले.’ बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही स्टार्स या घटनेवर काहीच का बोलत नाहीत? हे धक्कादायक आहे. असेही म्हटलं आहे. ( लिव्ह इन रिलेशनशिप )

हेही वाचलंत का? 

Back to top button