औरंगाबाद : जे. ई. देशकर, वेग आणि हॉर्नच्या स्पर्धेबरोबरच चालकांनी आता वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशझोताचीही स्पर्धा सुरू केली आहे. डोळ्यांपुढे अंधारी आणणाऱ्या हेडलाईटमुळे इतर वाहनधारक हैराण होत आहेत. हेडलाईटचा हाय बीम कधी व लो बीम कधी वापरावा, याचेही नियम आहेत. मात्र, ते पायदळी तुडवत महामार्गावरच नव्हे; तर शहरातही सरसकट वापर होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. या नियमबाह्य फोकसविरुद्ध पोलिस आणि परिवहन विभागही कानाडोळा करत असल्याने रात्री हा खेळ अनिर्बंधपणे चालतो. तो अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महामार्गावर स्पीड गन बसवून वाहनांना आवर घातला जातो. परंतु, हेडलाईटच्या प्रखर फोकसवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे समोरून येणा-या वाहन चालकांचे डोळे दीपतील अशा बेताने प्रकाश झोत टाकला जातो.
त्यामुळे समोरच्या वाहनचालकाच्या डोळ्यांपुढे काही सेकंद अंधारी येते आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. वाहन उद्योगातील वाढते संशोधन व विकसित वाढत आहे. तंत्रज्ञानासोबत हेडलाईटच्या प्रखरतेतही वाढ झाली आहे.
एलईडी प्रोजेक्टर लाईट, हॅलोजन याप्रकारचे बल्ब वाहन उत्पादकांकडूनच बसविले जातात. मानकानुसार उत्पादक कंपनी हेडलाईट बसवते. परंतु, त्यापेक्षा जास्त प्रखर हेडलाईट बेकायदेशीररीत्या बसवून घेतले जात आहेत. हे हेडलाईट काही पैसे मोजून स्थानिक बाजारात दंडाची तरतूद सहज उपलब्ध होतात. ते कायदेशीर आहेत की नाहीत याचीही खातरजमा वाहनमालक करत नाहीत. कंपनीने ठरवून दिलेल्या हेडलाईटपेक्षा जास्त अंतरावर प्रकाश फेकणारे बल्ब वापरणा-यांची संख्या मोठी आहे.
लहान वाहनधारक किंवा दुचाकीधारकांना या फोकसमुळे समोरचा रस्ताच दिसत नाही. यामुळे अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरटीओकडून प्रखर प्रकाशाचे हेडलाईट वापरणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने याचे प्रमाण वाढत आहे.
एखाद्या कारला एच-४ हॅलोजन बल्ब बसविलेले असतील, तर अतिउत्साही मालक एलईडी किंवा एचआयडी बल्ब बसवून लोकांचे डोळे दीपवत आहेत. मूळ हेडलाईटसाठी ६० वॅटचे बॅटरी कनेक्शन असते; परंतु ते वाढवून ९० किंवा १०० वॅट केले जाते. याचाही परिणाम 'फोकस'वर होतो.
दंडाची तरतूद
मोटार वाहन कायद्याच्या ११२ अपघातांना कारणीभूत ठरत आहे. आहेत की नाहीत, याचीही खातरजमा आणि १७७ कलमानुसार अतिप्रखर इंडिया (एआरएआय) ही संस्था वाहन प्रखरतेची तपासणी करण्यासाठी कोणतेही वाहन येत नसताना हाय बीम वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहनमालक करत नाहीत. कंपनीने प्रकाशझोताचा वापर केल्यास ३०० रुपयांची दंडाची तरतूद आहे. मात्र, या कलमानुसार केल्या जात असलेल्या कारवाईचे प्रमाण नगण्य आहे.
सहायक परिहन अधिकारी दीपक मेहेरकर यांनी सांगितले की, ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एएसआय) ही संस्था वाहन उद्योगासाठी संशोधन, तंत्रज्ञान, विकसन, नियमन आणि धोरण यावर केंद्र शासनाच्या अधीन काम करते. या संस्थेच्या परवानगीनुसारच नवीन वाहनांतील हेडलाईटला परवानगी दिलेली आहे. आमच्याकडे ठरवून दिलेल्या मानकांनुसार हेडलाइटच्या प्रखरतेची तपासणी करण्यासाठी हेडलाईट अॅनालायझर हे यंत्र आहे. यात तफावत आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येते; परंतु रस्त्यावर याची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
महामार्गांवरच हायबीम वापरण्याची परवानगी
केवळ महामार्गावर समोरून कोणतेही वाहन येत नसताना हाय बीम वापरण्याची परवानगी आहे. शहरांमध्ये तर हाय बीम वापरणे नियमबाह्य आहे. मात्र, शहरातही हाय बीमचा असह्य प्रकाशझोत टाकून इतर वाहनचालकांना त्रस्त केले जात आहे. महामार्गावरच हाय बीमला मान्यता या नियमभंगाबद्दल ५०० रुपये दंडाची केवळ महामार्गांवर समोरून तरतूद कायद्यात आहे.