पुढारी ऑनलाईन: संजय राऊतांना फक्त जामीन मिळाला आहे, त्यांची निर्दोष सुटका झालेली नाही. त्यामुळे बाहेर येताच तोंडाला येईल ते बोलत आहेत. त्यामुळे जनतेची दिशाभूल होत असल्याचे म्हणत बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत. आमची बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचेही ते म्हणाले.
कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी काल संजय राऊतांना १०२ दिवसांनंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच 'एकच शिवसेना खरी आहे, बाकी सर्व धोतऱ्याच्या कडू बिया', असे म्हणत राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. दरम्यान, संजय राऊत यांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, पण आम्ही कोणत्याही प्रकारे शिवसेना सोडली किंवा फोडली नाही, तर बाळासाहेबांची खरी शिवसेना ही आमचीच आहे. ही वेळ उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेवर का आली? ही गोष्ट गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या घटनांवरून आलीच असेल. संजय राऊत यांच्यामुळेच ही वेळ शिवसेनेवर आली आहे. फुटलेली शिवसेना ही एका बाजूला आणि संजय राऊत हे दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोणाला किती महत्त्व द्यायचे ते ठरवावे, असेही वक्तव्य शंभुराज देसाई यांनी केले आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असेलल्या अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवाच करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करत असताना अफजल खानाची कबर किंवा याभोवती असलेल्या भितींना कोणत्याही प्रकारे धक्का लावण्यात आलेला नाही. या कबरीच्या सभोवती जे अवैध बांधकाम करण्यात आले होते, ते फक्त काढण्यात येत असल्याचे मत साताराचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे.