HBD Sushmita Sen : सुष्मिता डेली रुटीनमध्ये फॉलो करते ‘या’ गोष्टी | पुढारी

HBD Sushmita Sen : सुष्मिता डेली रुटीनमध्ये फॉलो करते 'या' गोष्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्‍मिता सेन फिटनेस फ्रीक आहे. (HBD Sushmita Sen) सुष्मिता दिसायला खूप गॉर्जियस आहे, तितकाच तिचा फिटनेसदेखील आहे. फिट राहण्यासाठी ती केवळ जिमचं जात नाही तर इंटेंस योगा, एक्रिलिक योगा, स्‍वीमिंगदेखील करते. सुष्‍मिता आपल्या फिटनेससाठी स्ट्रिक्ट रूटीन फॉलो करते. वेळोवेळी ती तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करते. (HBD Sushmita Sen)
सुष्मिता सेन शरीराला फिट ठेवण्यासाठी आणि बॉडी फ्लेक्सिबलसाठी योग करते. पॉवर योगा ते मेडिटेशनपर्यंत सर्व प्रकारच्या वर्कआऊटचा समावेश तिच्या रुटीनमध्ये आहे. बॉडी बॅलेंस वाढवण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी जर तुम्ही सुष्मिता सेनप्रमाणे हेड स्‍टँड वर्कआऊटची प्रॅक्टिस कराल तर तुम्हालाही तिच्याप्रमाणे फिटनेस ठेवता येईल. आज तिचा १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस, त्यानिमित्ताने तिच्या फिटनेस आणि आहाराविषयी जाणून घेऊया.

स्‍वीमिंग एक फुल बॉडी वर्क आऊट आहे. जे तुमचे स्नायू स्‍ट्रॉन्‍ग करण्यासाठी आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. सुष्मितादेखील आपल्या फिटनेससाठी नेहमी स्‍वीमिंग करते आणि एन्‍जॉय करते.

सुष्मिता आपली बॉडी टोन्‍ड करण्यासाठी जिममध्य़े घाम गाळते. आपल्या इंटेस वर्कआऊटमध्ये रिंग जिम्नास्ट, पुशअप, पुलअप, किक बॉक्सिंग ते मार्शल आर्टच्या विविध पध्दतींचा अभ्‍यास करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

रुटीनमध्ये हे डाएट करते फॉलो

सुष्मिता सेन आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी एक कप आल्याचा चहा घेते. त्यानंतर एक ग्लास फळांच्या रसासोबत ३ अंडी वा दलिया खाते. सकाळी १० वाजता मुठ्ठीभर सुकामेवा, शेंगदाणे खाते. त्यानंतर दुपारी जेवणात एक वाटी भात, डाळ, भाजी आणि चिकन वा मासे खाते. संध्याकाळच्या नाश्तामध्ये सँडविच वा इडली, एक कप कॉफी सोबत एक वाटी उपमा खाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

Back to top button