मोशी : देहू-आळंदी रस्त्यावरील वृक्षतोडीवर कारवाई कधी? | पुढारी

मोशी : देहू-आळंदी रस्त्यावरील वृक्षतोडीवर कारवाई कधी?

मोशी; पुढारी वृत्तसेवा : आळंदी-देहू बीआरटी रोडवर सौंदर्यवाढीसाठी लावलेल्या वटवृक्ष, पिंप, बदाम, गुलमोहर आणि काही शोच्या वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू आहे. ती थांबवण्याची मागणी नागरिकांनी केूली आहे. सौंदर्य वाढविण्यासाठी तसेच ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेकडून अतिशय छान वृक्षारोपण करण्यात आले होते.

त्या वृक्षांची वाढसुद्धा छान झाली होती. यात त्यामुळे रस्ता परिसराचे सौंदर्य वाढले असताना याच वृक्षांची खुलेआम कत्तल होत आहे. प्रशासनाचे मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. वृक्षांची कत्तल कोण व का करतंय, अशी मागणी या परिसरातील स्थानिक नागरिक व अण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन प्रा. राजेश सस्ते, गोरक्षनाथ घिगे, राजू साकोरे, विनायक घिगे, हभप कुरकुटे महाराज यांच्यासह तीस जणांनी नाराजी व्यक्त केली.

Back to top button