Sonam Kapoor Baby Nursery : सोनमने बाळासाठी डिझाईन केली नर्सरी (Photos) | पुढारी

Sonam Kapoor Baby Nursery : सोनमने बाळासाठी डिझाईन केली नर्सरी (Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनम कपूरने २० ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. सोनम कपूरने (Sonam Kapoor Baby Nursery) तिच्या मुलाचे नाव ‘वायू’ ठेवले आहे, ज्याची झलक पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत. पण, आज सोनम कपूरने काही फोटो शेअर केले आहेत जे तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. वास्तविक, सोनम कपूरने ‘वायू’साठी पाळणाघर डिझाईन केले आहे. (Sonam Kapoor Baby Nursery)

‘वायू’ची आलिशान खोली

सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तिने ‘वायू’साठी नर्सरी डिझाईन केली आहे, जी खूपच लक्झरी आहे. सोनमने नर्सरी लाकडी फर्निचरने डिझाईन केलीय. या पाळणाघरात बरीच खेळणीही ठेवण्यात आली आहेत. खोलीत एक मोठे पेंटिंग आहे आणि त्यांचे सामान आणि ‘वायू’ कपडे ठेवण्यासाठी एक लहान कपाट देखील आहे.

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

सोनम कपूरनेही ‘वायू’चा पलंग अतिशय आलिशान बनवला आहे, जो दिसायला खूपच आकर्षक आहे. लहान-मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व काही या खोलीत आहे. हे फोटो शेअर करताना तिने आपल्या मुलासाठी एक खास नोटही लिहिली आहे. सोनम कपूरने लिहिले, ‘ही त्या लोकांसाठी कौतुकास्पद पोस्ट आहे ज्यांनी माझ्या बाळाला येण्यासाठी मदत केली आहे.’ अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनमने शेअर केलेल्या फोटोला आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले आहे. ही खोली पाहून सर्वजण ‘वायू’च्या खोलीचे कौतुक करत आहेत. खोली पाहून काहींनी ‘लकी बेबी’ म्हटले तर काहींनी सोनमवर प्रेमाचा वर्षाव केला. सोनम कपूरने ८ एप्रिल,२०१८ रोजी बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

Back to top button