पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड उच्च न्यायालयाने (Uttarakhand High Court) नुकत्याच एका बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीचा अल्प मुदतीचा जामीन मंजूर केला. जेणेकरून त्याचे आणि पीडितेचे लग्न होऊ शकेल. या प्रकरणी न्यायमूर्ती रवींद्र मैठानी यांनी म्हटले आहे की, "बलात्काराच्या प्रकरणात साधेपणाने न्यायालय दोघांमधील (पक्षकारांमधील) विवाहास प्रोत्साहन देऊ शकत नाही. हे बलात्काराचे साधे प्रकरण नाही."
या प्रकरणातील दोघांचे (पक्षकारांचे) लग्न ठरले होते. त्यानंतर संशयित आरोपीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी संशयितावर आयपीसी ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, त्याचे आणि पीडितेचे लग्न होत असल्याचे कारण देत त्याने अल्प मुदतीच्या जामीनासाठी अर्ज केला होता.
या प्रकरणाच्या नोंद झालेल्या एफआयआरनुसार, संशयित आरोपी आणि पीडितेची एकमेकांशी मैत्री होती. त्यांचे लग्न ठरले होते. त्यानंतर संशयिताने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच किमतीच्या हमीवर संशयित आरोपीला दोन आठवड्यांसाठी जामिनावर सोडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या अल्प मुदतीच्या जामिनाची मुदत संपल्यानंतर अर्जदाराने संबंधित न्यायालयासमोर शरणागती पत्कारावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. (Uttarakhand High Court)
हे ही वाचा :