Leslie Phillips : 'हॅरी पॉटर' स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन | पुढारी

Leslie Phillips : 'हॅरी पॉटर' स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘हॅरी पॉटर’च्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. हॅरी पॉटर मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे ब्रिटिश अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे निधन झाले आहे. (Leslie Phillips) अनेक दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रिपोर्टनुसार, फिलिप्स यांच्या पश्चात पत्नी जारा आहे. फिलिप्स यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांचा एजंट जोनाथन लॉयड यांनी केली. ते म्हणाले की, त्यांचे ‘झोपेत शांततेत’ निधन झाले. पहिल्या दोन स्ट्रोकमध्ये ते वाचले होते. (Leslie Phillips)

हॅरी पॉटर सीरीजमध्ये हॅरी पॉटरची मुख्य भूमिका असलेल्या द सॉर्टिंग हॅटला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. ‘हॅरी पॉटर’ या चित्रपटामुळे ते तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. फिलिप्स यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केले होते.

Back to top button