पुणे : सात वर्षांच्या मुलावर अत्याचार करणार्‍याला बेड्या | पुढारी

पुणे : सात वर्षांच्या मुलावर अत्याचार करणार्‍याला बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केस कापण्यासाठी सलूनमध्ये आलेल्या सात वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी सलूनमधील कामगाराला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सज्जन सहेआलम सलमानी (20, रा. संतनगर, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी (दि. 7) पीडित मुलाची आई केस कापण्यासाठी मुलाला विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सलूनमध्ये घेऊन गेली होती. तेथे वेळ लागणार असल्याने ती महिला मुलाला केस कापण्यासाठी तेथेच सोडून घरी निघून आली. याचाच फायदा घेत संबंधित सलूनमधील कामगाराने मुलाला आतील खोलीत नेत त्याच्याशी अश्लील चाळे करून अनैसर्गिक कृत्य केले.

दरम्यान, ही गोष्ट कोणालाही सांगितल्यास त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. संशयित आरोपीने या वेळी मुलाची केस कापून घरी पाठवून दिले. परंतु, मुलाने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने त्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिल्यानंतर सलमानीवर विनयभंग आणि पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिली.

Back to top button