पुणे : 62 लाख रुपयांचा व्यावसायिकाला गंडा | पुढारी

पुणे : 62 लाख रुपयांचा व्यावसायिकाला गंडा

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : एका व्यावसायिकाला गॅस पाइपलाइन किट व स्टेशनरी सप्लायरची खोटी बिले सादर करून व्यावसायिकाची बनावट सही करून चेक पास करून घेत 62 लाख 20 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांवर येरवडा पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित प्रकार ऑगस्ट 200 ऑक्टोबर 2022 यादरम्यान येरवडा येथील टेक पार्क-1 टॉवर या ठिकाणी घडलेला आहे. याबाबत प्रदीप मेघराज बांठिया (वय 58, रा. मुंढवा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय दत्तात्रय पंडित (वय 41), शबनम बानो (पुणे), ऑक्सिमेडिकल प्रोटेक्टचे प्रोपायटर, पुणे, ’मेघा ट्रेडर्स’चे प्रोपायटर, पुणे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार प्रदीप बांठिया यांच्या कंपनीत आरोपी संजय पंडित हे कामास असून, त्यांनी इतर आरोपींसोबत संगनमताने कट रचला. आयसीआयसीआय बँक एमजी रोड, पुणे येथील खात्याचे वेगवेगळे 62 लाख 20 हजार रुपये किमतीचे तीन चेक इतर आरोपींच्या नावाने गॅस पाइपलाइन किट व स्टेशनरी सप्लायरची खोटी बिले सादर करून त्या चेकवर सागर चोरडिया यांची बनावट सही करून सदर चेक बँकेतून पास करून 62 लाख 20 हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक करण्यात आली आहे.

Back to top button