हृदयी प्रीत जागते : पंकज विष्णू आणि मंदार देवस्थळींचा तो फोटो चर्चेत

पंकज विष्णू आणि मंदार देवस्थळीं
पंकज विष्णू आणि मंदार देवस्थळीं
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : २००५ मधील 'अवघाची हा संसार' मालिकेनंतर 'ह्रदयी प्रीत जागते' मालिकेद्वारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि अभिनेते पंकज विष्णू भेटीला येणार आहेत. तब्बल १७ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र दिसून येणार आहेत. येत्या ७ नोव्हेंबरपासून झी मराठीवर ही मालिका आपल्या भेटीस येणार आहे.

दिग्दर्शकला कॅप्टन ऑफ द शीप का म्हणतात? ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे दिग्दर्शक मंदार देवस्थळी. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांना सतत नवीन काहीतरी देत असतानाच आपल्या नवीन कलाकारांसह ज्येष्ठ अनुभवी कलाकारांची योग्य सांगड कशी घालावी ही त्यांची कला वाखाणण्याजोगी आहे. हृदयी प्रीत जागते मालिकेच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि अभिनेते पंकज विष्णू यांच्या मैत्रीची आणि एकत्र रंगणाऱ्या कामाची साक्ष असलेला १७ वर्षांपूर्वीचा एक फोटो पंकजजींना नुकताच सापडला. जुन्या आठवणींना उजाळा देत आणि आजच्या ट्रेंडनुसार जुनी आठवण नव्याने त्यांनी टिपली.

पंकज विष्णू, राजन भिसे, पौर्णिमा तळवलकर यांसारख्या एकापेक्षा एक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाचा आस्वाद मालिकेच्या निमित्ताने घेता येणार आहे. 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा आहे. ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोघेही त्यांच्या स्वभावात आणि जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत. पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे. नायिका कीर्तन गायिका आहे आणि त्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे. तर नायक रॉक बँड परफॉर्मर आहे. ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे. आता हेच संगीत ह्या दोन आत्म्यांना कसं एकत्र आणते हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news