पुणे : मध्यवस्तीतून जाणारे पीएमपीचे 7 मार्ग पूर्ववत | पुढारी

पुणे : मध्यवस्तीतून जाणारे पीएमपीचे 7 मार्ग पूर्ववत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपी प्रशासनाने विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांंची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर 2022 पासून मध्यवस्तीतून जाणारे 7 मार्ग पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता पूर्वीप्रमाणेच बस उपलब्ध होतील.

शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्‍या बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पीएमपीने 28 जुलै 2022 पासून येथील 7 मार्गांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बाजीराव रस्त्याने जाणार्‍या बस दांडेकर पूल, शास्त्री रोड, फर्ग्युसन कॉलेज रस्तामार्गे जात होत्या. शिवाजी रस्त्याने येणार्‍या बस जंगली महाराज रस्ता डेक्कन, टिळक रोडमार्गे अशा जात होत्या. यामुळे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ती आता टळणार आहे.

या सात मार्गांची सेवा पूर्ववत…

अ. क्र. मार्ग क्रमांक मार्गापासून पर्यंत बससंख्या खेपांची संख्या
1) 2 अ कात्रज ते शिवाजीनगर 02 20
2) 20 सहकारनगर ते संगमवाडी 01 16
3) 21 स्वारगेट ते सांगवी 08 104
4) 30 मार्केट यार्ड ते घोटावडे फाटा 07 56
5) 37 न. ता. वाडी ते सहकारनगर 02 40
6) 68 अप्पर डेपो ते सुतारदरा 01 8
7) 354 मार्केट यार्ड ते पिंपरीगाव 10 100

 

 

Back to top button