Accident : केज-बीड रोडवर एस.टी-पिकअपचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी | पुढारी

Accident : केज-बीड रोडवर एस.टी-पिकअपचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

केज पुढारी वृत्तसेवा: Accident : केज-बीड रोडवर मस्साजोगजवळ एस.टी आणि पिकपचा गंभीर अपघात झाला. या अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (दि. १७) रात्री ८:३० वाजेच्या दरम्यान केज-बीड रोडवर पिंप्रीकडे जाणाऱ्या फाट्याजवळ हा अपघात झाला.

शेतात सोयाबीन काढणीसाठी मजुरांना घेऊन जाणारा पिकअप क्र. (एम एच/३२/बी ९७३६) आणि धारूर आगाराची धारूर-मुंबई एस.टी क्र. (एम एच-१४/बी टी-२५१५) यांचा अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील आदिनाथ घोळवे (वय-३० वर्ष) आणि बाबासाहेब ठोंबरे (वय-३६ वर्ष) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच १०८ क्र. रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी हजर होत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, जमादार उमेश आघाव, पोलीस जमादार देवकते, पोलीस नाईक बाळराजे सोनवणे, पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना मदत केली.

हे ही वाचा :

Pandharpur Accident : कोल्हापूरच्या ७ वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू, पंढरपूरला जाताना भरधाव कारने उडवले

गर्भधारणेदरम्यान मानसिक आरोग्याची घ्या काळजी

Back to top button