Pooja Dadlani : पुजा ददलानीने शेअर केला शाहरुख सोबतचा सेल्फी…दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी | पुढारी

 Pooja Dadlani : पुजा ददलानीने शेअर केला शाहरुख सोबतचा सेल्फी...दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मॅनेंजर पुजा ददलानी (Pooja Dadlani) आणि शाहरुखचा (Shahrukh Khan) वाढदिवस एकाच दिवशी असतो. पुजा ददलानीने शाहरुख खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ते दोघेही आपला वाढदिवस मन्नत बंगल्यावर सेलिब्रेट करतात. त्यानंतर शाहरुख आपल्या बाल्कनीत चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारायला आला. पुजाने हे फोटोज सोशल मीडियावर आज सकाळी (दि.२) शेअर केले आहेत.

 Pooja Dadlani : दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी 

पुजाने शेअर केलेला हा सेल्फी शाहरुख खानने क्लिक केलेला आहे. त्यामध्ये शाहरुख खान आणि पुजा दिसत आहे. दोघानींही काळा रंगाचे कपडे घातले आहेत. शाहरुख मध्यरात्री मुलगा अबरामसोबत मन्नतच्या बंगल्यावर चाहत्यांच्या शुभेच्छा घ्यायला आला. २०१२ पासून

कोण आहे पुजा 

पुजा बद्ल सांगायच तर पुजा ही २०१२ पासून ती शाहरुखची मॅनेंजर आहे. पुजाचे फक्त शाहरुख सोबतच नव्हे तर संपूर्ण खान कुटुंबाशी घट्ट नातं तयार झालं आहे. पुजाचे शाहरुखसह गौरी खान, त्यांची मुलं आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम यांच्याशी तिचे चांगले संबंध आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी पुजाचीही चौकशी करण्यात आली होती.

पठाण -शाहरुख  खान 

शाहरुख आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर प्रद्रशित करणार आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे पठाण. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दिपीका पदुकोण, जॉन अब्राहम आहे.

हेही वाचा

Back to top button