Mankhurd Railway Station : काळजाचा ठोका चुकला! धावत्या लोकलमधून पडलेल्या महिला आणि तिच्या मुलाला आरपीएफ जवानांनी वाचवले (व्हिडिओ) | पुढारी

Mankhurd Railway Station : काळजाचा ठोका चुकला! धावत्या लोकलमधून पडलेल्या महिला आणि तिच्या मुलाला आरपीएफ जवानांनी वाचवले (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानखुर्द रेल्वे स्थानकावर (Mankhurd Railway Station) चढल्यानंतर प्रवाशांच्या धक्क्यामुळे चालत्या लोकल ट्रेनमधून पडलेल्या महिला आणि तिच्या मुलाला रेल्वे संरक्षण दलाच्या गुन्हे शाखेच्या दोन जवानांनी वाचवले. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रेल्वे स्थानकावर अशा अनेक जीवघेण्या घटना घडत असतात. अशीच एक जीवघेणी घटना मुंबईमधील मानखुर्द रेल्वे स्थानकावर घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे स्थानकावर एक महिला आणि तिचे मुल रेल्वे लोकल डब्यात चढल्यानंतर प्रवाशांच्या धक्क्यामुळे ते चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडले. ही घटना निदर्शनास येताच प्रसंगावधन राखत रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) गुन्हे शाखेच्या दोन जवानांनी पडलेल्या महिला आणि तिच्या मुलाला वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहितीनुसार, सोशल मीडियावर मानखुर्द रेल्वे स्थानकावरील व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील महिलेचं नाव सुमन सिंह आहे. ती  आपल्या एक वर्षाच्या मुलासह मानखुर्दवरून कोपरखैरणेला जाण्यासाठी निघाली होती. मुलाला घेऊन लोकलमध्ये चढली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. प्लॅटफॉर्मवरून लोकल सुटल्यानंतर सुमन सिंह यांचा अचानक पाय घसरला. त्यामुळे मुलासह त्या धावत्या लोकलमधून खाली कोसळल्या. कोसळल्याचं दिसताच तिथे असलेल्या आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत धाव घेतली आणि खाली पडलेल्या महिलेच्या हातातून मुलाला स्वतःकडे घेतलं.

हेही वाचा

Back to top button