ayesha kapur : ‘ब्लॅक’ फेम आयशा कपूर दिसणार या चित्रपटात | पुढारी

ayesha kapur : 'ब्लॅक' फेम आयशा कपूर दिसणार या चित्रपटात

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय लीला भन्साळींचा हिट चित्रपट ‘ब्लॅक’ चित्रपटात राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका आयशा कपूरने (ayesha kapur) साकारली होती. आता आयशा मोठी झालीय. अभिनेत्री म्हणून आगामी चित्रपट ‘हरि-ओम’ बॉलीवूडमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहे. ‘हरि-ओम’ चे शूटिंग या महिन्यात भोपाळमध्ये सुरू होईल आणि डिसेंबरमध्ये फायनल शेड्यूल संपेल. आयशा ही २८ वर्षांची आहे. ती न्यूयॉर्कमध्ये कोलंबियामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली होती. कुलविंदर बख्शीश (भाषेचे प्रशिक्षक ज्यांनी आमिर खानला पंजाबीमध्ये ‘लाल सिंह चड्ढा’ साठी प्रशिक्षित केलं होतं)  यांच्‍याकडे  जवळपास ६ महिन्यांपासून हिंदी डिक्शनवर ती काम करत आहे.  (ayesha kapur)

दामदार स्टार्ससोबत अभिनय

ती हरि ओमसाठी अभिनेता अंशुमन झा यांच्यासोबत कार्यशाळादेखील करत आहे. याशिवाय चित्रपटात रघुबीर यादव, सोनी राजदान, आयशा कपूर आणि मनु ऋषी चड्ढा यासारखे दिग्गज कलाकारदेखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

मध्य प्रदेशमध्ये शूटिंग होणार

आयशा म्हणाली, “या चित्रपटामध्ये मी रघुबीर यादव सर आणि सोनी राजदान मॅम यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. अंशुमन यांच्यासोबत काम करणं उत्तम आहे. मी वास्तवात त्यांचा अभिनय आणि त्यांनी निवडलेल्या स्क्रिप्टचे कौतुक करते. मध्य प्रदेशात शूटिंग करण्यासाठी मी उत्सुक आहे.”

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

Back to top button