आर्यन खान पुन्हा चर्चेत | पुढारी

आर्यन खान पुन्हा चर्चेत

नुकतेच बॉलीवूड कलाकारांनी घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. आता या पार्ट्याना स्टार किड्सदेखील हजेरी लावत असतात, दिवाळी पार्टीनंतर आता स्टार किड्सनी हॅलोवीन पार्टी आयोजित केली होती. नुकतेच त्याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले शनिवारी रात्री या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला आर्यन खान, अनन्या पांडे, शनाया कपूर आणिअन्य बॉलीवूड सेलिब्रेटी हजर होते. या पार्टीतला आर्यन खानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने काळ्या रंगांचे कपडे घातले आहेत आणि चंदेरी जॅकेट त्यावर घातले आहे. खास पार्टीसाठी त्याने डोळ्यांचा विशिष्ट लूक केला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकर्‍यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एकाने लिहिले आहे की, ‘फोटोग्राफर मंडळींना थोडा तरी आदर दाखव’, तर एकाने लिहिले आहे ‘याला एवढी विनंती करण्याची गरज नाही’. काहींनी लिहिले आहे ‘याला खूपच माज आलेला दिसतोय’. ‘वडिलांच्या पैशावर माज दाखवतोय’ असेही काही जण म्हणाले आहेत.

Back to top button