सनी लिओनीला हिंदी भाषा बोलता येते. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिला फारसे हिंदी येत नसावे असे अनेकांना वाटले होते, पण तिने दिलेल्या अनेक मुलाखतींत सनी उत्तम हिंदी भाषा बोलताना दिसली. तिचा पापाराझी छायाचित्रकारांना हिंदी भाषेत उत्तर देतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सनी पंजाबी तसेच हिंदी भाषा उत्तम बोलते.सध्या सनी काही कामानिमित्त मुंबईबाहेर गेली आहे. यादरम्यान मुंबई विमानतळावर तिला पापाराझी छायाचित्रकारांनी घेरले. यावेळी पापाराझी छायाचित्रकारांना तिने आपल्याला उत्तम हिंदी येत असल्याची आठवण करून दिली. ती म्हणाली, तुम्हाला असे वाटते का मी हिंदी भाषेमध्ये बोलू शकत नाही? तुम्हीच इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधता तर मी काय करू? तसेच धन्यवाद, उद्या भेटू. असे वाक्य ती पुन्हा बोलताना व्हिडीओत दिसली.