South Korea : दक्षिण कोरियात हॅलोवीन पार्टीतील गर्दीत १२० हून अधिक लोकांचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओमध्ये मृतदेहांचा खच | पुढारी

South Korea : दक्षिण कोरियात हॅलोवीन पार्टीतील गर्दीत १२० हून अधिक लोकांचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओमध्ये मृतदेहांचा खच

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियाची राजधानी सियॉलमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. इटावान जिल्ह्यातील लोकप्रिय ठिकाण म्हणून ओळखले जाणारे हॅलोवीन येथे शनिवारी (दि. २९) रात्रीच्या वेळेस ही घटना घडली. याव्यतिरिक्त १०० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. येथील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनूसार हॅलोवीन पार्टीत झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये आणखी लोकांचा मृत्यू झाल्याचे देखील सांगितले जात आहे. (South Korea)

सियॉलच्या इटावान जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेबाबत अध्यक्ष युन सुक-येओल यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. युन सुक-येओल यांनी येथील इतर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाला मदतीसाठी घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, हॅलोविन मध्ये घडलेल्या घटनेनंतर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेकांना श्वासोच्छवासाची त्रास होता. (South Korea)

हॅलोवीन पार्टीत झालेल्या गर्दीचे फोटो

Image

याबाबत अधिक माहिती अशी की, हॅलोविन पार्टी साजरी करण्यासाठी आलेले लोक एका अरुंद रस्त्यावर जमले होते. अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये सुमारे १०० लोक जखमी झाले. नॅशनल फायर एजन्सीचे अधिकारी चोई चेओन-सिक यांनी सांगितले की, इटावान लीजर जिल्ह्यामध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या लोकांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. अजून असे डझनभर लोक आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेले माहितीनूसार, काहींना इटावानच्या रस्त्यावरच लोकांना उपचार दिले जात आहेत, तर काहींना जवळच्या रूग्णालयामध्ये नेण्यात येत आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक येओल यांनी पीडितांना त्वरित वैद्यकीय उपचार आणि उत्सवाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आवाहन केले.

हॅलोवीन पार्टीतील मृतदेहांचे खच

Image

हेही वाचा

Back to top button