आई कुठे काय करते’ मधील अरूंधती फेम मधुराणी प्रभुलकरच्या कुटुंबियांची ऑनलाईन फसवणूक | पुढारी

आई कुठे काय करते' मधील अरूंधती फेम मधुराणी प्रभुलकरच्या कुटुंबियांची ऑनलाईन फसवणूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कळत नकळत का होईना अनेकजण या फसवणुकीला बळी पडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अनेकदा सेलिब्रिटीही या फसवणुकीला सामोरे जाताना दिसतात. आताही अशीच एक घटना प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडली आहे. ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर हिच्यासोबत ऑनलाईन फसवणुकीची घटना घडली.

मधुराणी आणि पती प्रमोद प्रभुलकर यांनी दिवाळी सुट्टी घालवण्यासाठी गणपतीपुळे येथे हॉटेलचं ऑनलाइन बुकिंग केलं होतं. यासाठी त्यांनी जवळपास सतरा हजार पे केले होते. पण तिथे गेल्यावर प्रत्यक्षात वेगळीच घटना दिसून आली. त्यांच्या नावाने कोणत्याही ऑनलाईन बुकिंगची नोंद नव्हती. या प्रकरणामुळे मधुराणी आणि पती प्रमोद प्रभुलकर यांना चांगलाच मनस्ताप भोगावा लागला. या प्रकरणाची चौकशी केली असता हॉटेलची साईट हॅक करून हॅकर्सनी ही फसवणूक केल्याचं समोर आलं. प्रमोद यांच्यासह अनेकांची फसवणूक झाल्याचंही समोर आलं आहे.

Back to top button