बिग बॉस मराठी 4 : मी कोणालाच सपोर्ट नाही करणार - अमृता धोंगडे | पुढारी

बिग बॉस मराठी 4 : मी कोणालाच सपोर्ट नाही करणार - अमृता धोंगडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज यशश्री आणि अमृता धोंगडे कॅप्टन्सी टास्कविषयी चर्चा करताना दिसणार आहेत. सध्यस्थिती बघता सदस्यांसाठी कॅप्टन्सी आणि त्यासोबत येणारी इम्युनिटी मिळणे अत्यंत महत्वाचे आहे आणि ते मिळवण्यासाठी प्रत्येक सदस्य प्रयत्न करणार. यशश्री अमृताला सांगताना दिसणार आहे, अमृता पण उभी राहणार आहे कॅप्टन्सीसाठी ? मला नाही वाटतं, ते संधी देतील पण सपोर्ट नाही करणार. कारण आता तर सगळ्यांनाच व्हायचं आहे कॅप्टन.

Household Work : विवाहितेने कुटुंबासाठी घरकाम करणे म्‍हणजे क्रुरता नव्‍हे : उच्‍च न्‍यायालयाची स्‍पष्‍टोक्‍ती

अमृता धोंगडेचे म्हणणे आहे, मला असं वाटतं आहे अक्षय भांडेल त्याला (कॅप्टन) व्हायला… मी स्वतःहून सपोर्ट कोणालाच नाही करणार. मला विचारायला जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत नाही. कारण हे खूप चुकीचे आहे. माझ्याबाबतीत घडलेलं आहे असं. ठीक आहे मला माहिती आहे मी (तेजस्विनीच्या) हिच्या बाजूने खेळणार आहे पण एक बाजू अशी देखील होती कि समोरून आले तर विचारा करायला. बघूया पुढे काय होईल ? ते आजच्या भागात.

Back to top button