नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुरुष आणि महिला क्रिकेट खेळाडूंच्या मानधनाबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. BCCI ने करारबद्ध भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी समान मानधन धोरण लागू करण्याची घोषणा केली आहे. यानुसार पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना सामन्यासाठी दिले जाणारे समान असेल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत दिली आहे.
"आम्ही बीसीसीआय करारबद्ध महिला क्रिकेट खेळाडूंसाठी पे इक्विटी धोरण (pay equity policy) लागू करत आहोत. क्रिकेटर्स क्रिकेटमधील स्त्री-पुरुष समानतेच्या नव्या युगात प्रवेश करत असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल." असे जय शहा यांनी म्हटले आहे.
BCCI ने करारबद्ध केलेल्या महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटू इतकेच मानधन दिले जाईल. कसोटी सामन्यासाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख, T20I साठी ३ लाख मानधन दिले जाईल. समान मानधन धोरण ही आमच्या महिला क्रिकेटपटूंप्रती बांधिलकी होती आणि त्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो, असे जय शहा यांनी म्हटले आहे.
याआधी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने असाच निर्णय घेतला आहे. पुढील पाच वर्षांसाठी महिला आणि पुरुष संघातील क्रिकेट खेळाडूंना समान मानधन दिले जाईल असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी समान मानधन धोरण लागू केले आहे.
हे ही वाचा :