Household Work : विवाहितेने कुटुंबासाठी घरकाम करणे म्‍हणजे क्रुरता नव्‍हे : उच्‍च न्‍यायालयाची स्‍पष्‍टोक्‍ती | पुढारी

Household Work : विवाहितेने कुटुंबासाठी घरकाम करणे म्‍हणजे क्रुरता नव्‍हे : उच्‍च न्‍यायालयाची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जर एखाद्या विवाहित महिलेला कुटुंबासाठी घरकाम करायला सांगितले तर ती मोलकरीण ठरत नाही. विवाहितेने आपल्‍या कुटुंबासाठी घरकाम करणे ( Household Work ) म्‍हणजे क्रुरता नाही, असे निरीक्षण मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाच्‍या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती राजेश एस पाटील यांनी नोंदवले. तसेच भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 498 (अ) अन्वये क्रूरतेसाठी महिलेचा पती आणि सासरच्यांविरुद्ध दाखल गुन्‍हा रद्द करण्‍याचे आदेशही खंडपीठाने दिला.

 विवाहितेने केली होती पतीसह सासरच्‍या मंडळीविरोधात तक्रार

लग्‍नानंतर एक महिना मला चांगली वागणूक मिळाली. मात्र महिन्‍यानंतर पतीसह सासरची मंडळी मला मोलकरणीप्रमाणे वागवू लागले. तसेच कार घेण्‍यासाठीही माहेरहून चार लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्‍यास सुरुवात केली. यासाठी माझा शारीरिक व मानसिक छळ करण्‍यात आला, अशी तक्रार विवाहितने पोलीस ठाण्‍यात केली.

Household Work : पतीने घेतली होती उच्‍च न्‍यायालयात धाव

या प्रकरणी पतीसह सासर्‍यावर पोलिसांनी पती व सासर्‍यावर ‘आयपीसी’मधील  कलम 498 (अ) हुंड्यासाठी छळसह  पतीवर आयपीसीच्या कलम 323 (स्वेच्छेने दुखापत करणे), 504 (हेतूपूर्वक अपमान) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) कलमान्‍वये गुन्‍हा दाखल केला होता. पत्‍नीचे सर्व आरोप निराधार असल्‍याचा दावा करत पत्‍नीने पोलिसांनी केलेली कारवाई रद्‍द करण्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती.

पती आणि सासरच्या मंडळींविरुद्धचा एफआयआर रद्द

पत्‍नीने यापूर्वीही असाच प्रकार आहे. तिने आपल्‍या पहिला पती आणि त्‍याच्‍या कुटुंबाविरोधात अशीच तक्रार दिल्‍याचे पतीने न्‍यायालयाच्‍या निदर्शास आणून दिले. याप्रकरणातही सर्वांची निर्दोष मुक्‍तता झाल्‍याचे पतीने न्‍यायालयास सांगितले.

यावेळी खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, मानसिक आणि शारीरिक छळ या शब्दांचा वापर करणे भारतीय दंड संहितेच्या कलम 498A नुसार कारवाई करण्‍यास पुरेसे नाही. कारण शारीरिक व मानसिक छळ कसा झाला याचे वर्णन स्‍पष्‍ट झाल्‍याशिवाय या कृत्‍याला छळ झाला किंवा एखाद्या व्यक्तीला क्रूर वागणूक दिली, असा निष्‍कर्ष काढता येणार नाही. त्‍यामुळेच या प्रकरणात संबंधित विवाहित महिलेने आपल्‍या पतीवर केलेले आरोप हा गुन्‍हा ठरत नाही, असे नमूद करत खंडपीठाने   पती आणि सासरच्या मंडळींविरुद्धचा दाखल गुन्‍हा   रद्द  करण्‍याचे आदेश दिला. विवाहितेला घरकाम करण्‍याची इच्‍छा नव्‍हती तर तिने लग्‍नाआधी किंवा लग्‍नानंतर याबाबत सांगायला हवे होते. हा प्रश्‍न चर्चेतून सोडवायला हवा होता, असेही या वेळी खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

Back to top button