बिग बॉस मराठी 4- day 19 : इतक्या वर्षांनी कोणी माझ्या मिठीत आलं – अपूर्वा | पुढारी

बिग बॉस मराठी 4- day 19 : इतक्या वर्षांनी कोणी माझ्या मिठीत आलं - अपूर्वा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या (बिग बॉस मराठी 4- day 19) घरामध्ये सुरु आहे “वाजवा रे वाजवा” कॅप्टन्सी कार्य. कार्यामध्ये मिळालेल्या ब्रेकमध्ये सदस्यांमध्ये सुरु आहे चर्चा आणि कसं आपल्याला जिंकता येईल याची स्ट्रॅटेजी बनवत आहेत. कोणाच्या विरोधात कोणाला पाठवायचे. अपूर्वाचं मात्र वेगळं सुरु आहे असं सदस्यांना वाटले. कारण तिने मध्येच सांगितले इतक्या वर्षांनी कोणी माझ्या मिठीत आलं, आणि ते पण इतक्या वेळ… तर अक्षयने विचारले योगेशच्या विरोधात कोण खेळणार? मेघा ताई आणि समृद्धी असे म्हटले असता अक्षय म्हणाला नाही चूक त्रिशूलला पाठवूया. (बिग बॉस मराठी 4- day 19)

अपूर्वा या निर्णयावर सहमत झाली म्हणजे योगेशच्या विरोधात त्रिशूल आणि ताई खेळणार आपल्याकडून. तेजस्विनीच्या टीममध्ये देखील याचविषयी सुरु असताना योगेश म्हणाला, त्रिशूल, अक्षय… मुलगा किंवा मुलगी कोणी येऊ देत मी नाही बघणार पुढे कोण आहे. पुढे कार्यात त्रिशुल – योगेश आमनेसामने येणार आहेत.

bigg boss Marathi 4
bigg boss Marathi 4

Back to top button