

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीचा सण जवळ आला आहे. सर्वजण तयारीत बिझी आहेत. मग, सणासुदीच्या वेळी सेलिब्रिटी कसे मागे राहतील? या दिवसांमध्ये बी-टाऊनच्या रस्त्यांवरही दिवाळी साजरी केली जाते. दररोज कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटींच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले जात आहे आणि स्टार्स त्या पार्टीची शोभा वाढवत आहेत. अलीकडेच आयुष्मान खुराना, क्रिती सेनॉन आणि रमेश तौरानी यांनी दिवाळी पार्टी आयोजित केली होती. दुसरीकडे, सेलेब्सचे आवडते फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ची दिवाळी पार्टी होती.
या पार्टीत एकाच छताखाली सर्व स्टार्स एकत्र जमले होते. यामध्ये शाहरुख खानची लेक सुहाना खानने देखील हजेरी लावली होती. विकी कौशल, कॅटरिना कैफ, खुशी कपूर, जान्हवी कपूर, वरुण धवन, क्रिती सेनॉन, माधुरी दीक्षित, करण जोहर, सारा अली खान, नोरा फतेही, अनन्या पांडे आणि सुहाना खान यांच्यासह अनेक स्टार्स मनीष मल्होत्राच्या पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीत प्रत्येकजण खूपच सुंदर दिसत होता. मात्र शाहरुख खानची कन्या सुहाना खान येताच कॅमेरे तिच्याकडे वळले. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या होत्या.
सर्व स्टार्समध्ये स्टार किड सुहाना खानची उपस्थिती लक्षणीय होती. सिल्व्हर कलरच्या साडीत सुहाना खान खूपच क्यूट दिसत होती. सिल्व्हर कलरच्या तिच्या साडीवर भारी काम होतं. तिने साडीसोबत डीप नेक स्लीव्हलेस ब्लाऊज कॅरी केला होता. तसेच सुहानाने ही साडी अगदी वेगळ्या पद्धतीने नेसली आहे. सुहानाचा हलकासा मेकअप तिचा लुक आणखी वाढवत आहे. सुहानाला पाहताच पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्याचवेळी सुहानाही हसत-हसत पोज देताना दिसली.
सुंदर ड्रेससह, सुहानाने केसांचा बन बनवला होता, जो तिला खूप शोभून दिसत होता. सुहानाचा हा लूकमध्ये पाहून चाहत्यांना दीपिका पदुकोणची आठवण झाली. ही दीपिका काय आहे, असे विचारत यूजर्स सोशल मीडियावर कमेंट करू लागले.