बिग बॉस मराठी – 4, day 19 : घरात सुरु आहे “वाजवा रे वाजवा” कॅप्टन्सी कार्य | पुढारी

बिग बॉस मराठी - 4, day 19 : घरात सुरु आहे "वाजवा रे वाजवा" कॅप्टन्सी कार्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले “वाजवा रे वाजवा” कॅप्टन्सी कार्य. (बिग बॉस मराठी -4 day 19) अपूर्वा आणि तेजस्विनी यांच्यामध्ये हे कार्य पार पडणार आहे. कोण होणार घराचा नवा कॅप्टन हे आज कळेलच. पण, दोन्ही ग्रुप मधील सदस्य भन्नाट स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग करताना दिसत आहेत. या कॅप्टनसी कार्यामध्ये कोण कोणाची वाजवणार? अपूर्वा आणि तेजस्विनीमध्ये कोण कोणाला मागे टाकून बनेल घराची नवी कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. अपूर्वा त्रिशूलला सांगताना दिसणार आहे, त्यांनी सगळं उचललं असेल आणि फेकलं असेल शक्तीच्या बळावर पण युक्तीदेखील लागते जी त्यांच्याकडे नाहीये. (बिग बॉस मराठी -4 day 19)

मेघाचे म्हणणे आहे, आपली कॉपी करायला गेले, तुम्हाला का नाही सुचत आधी… त्यावर अपूर्वाचे म्हणणे आहे -कारण प्लॅन माहितीच नाहीये. तेजस्विनी टीमला सांगताना दिसणार आहे, मेघा ताई ज्या रित्या भांडतात काही बघतच नाही त्या टास्क दरम्यान अक्षय, समृद्धी आणि अपूर्वामध्ये चर्चा रंगली आहे ती अमृता धोंगडे आणि यशश्रीबद्दल. अपूर्वा अक्षय आणि समृद्धीला सांगताना दिसणार आहे,”अमृता प्रचंड चिडली आहे, हे लक्षात ठेवा. यशश्री पण…. दोघीपण विमझिकल आहेत.” बघूया आज टास्कमध्ये पुढे काय घडलं.

Back to top button