अमेरिकेकडून भारताला दिवाळी गिफ्ट : तस्करी केलेल्या ३०७ प्राचीन कलाकृती दिल्या परत | पुढारी

अमेरिकेकडून भारताला दिवाळी गिफ्ट : तस्करी केलेल्या ३०७ प्राचीन कलाकृती दिल्या परत

अमेरिकेची भारताला दिवाळी गिफ्ट : तस्करी केलेल्या ३०७ प्राचीन कलाकृती दिल्या परत

पुढारी ऑनलाईन : भारतातून लांबवलेल्या जवळपास ३०७ मौल्यवान कलाकृती परत देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मॅनहटन जिल्ह्याचे अॅटर्नी कार्यालयाने दिलेली आहे. न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासाकडे या कलाकृती सोपवण्यात आल्या आहेत. (US Returns stolen artefacts to India)

भारतीय नागरिकांना या कलाकृती परत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे अॅटर्नी कार्यालयाने म्हटले आहे.

या कलाकृतीची किंमत जवळपास ४ दशलक्ष डॉलर इतकी आहे. या कलाकृतींची तस्करी करून अमेरिकेत नेण्यात आल्या होत्या. प्राचीन कलाकृतीची तस्करी करणारा व्यापारी सुभाष कपूर याने तस्करीच्य मार्गाने अमेरिकेत नेल्या होत्या. कपूरवर वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. वेगवेगळ्या देशांतील प्राचीन, ऐतिहासिक कलाकृतींची तस्करी करायची आणि खोटी कागदपत्रे बनवून विक्री करायचे असे हे रॅकेट चालत होते.

गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील तपास यंत्रणा ऑपेरशन हिडन आयडॉल या नावाने अशा कलाकृतींचा शोध घेत आहेत. आतापर्यंत २,५०० कलाकृतींचा छडा लावण्यात अमेरिकाला यश आले आहे.

सोमवारी भारताला परत करण्यात आलेल्या कलाकृतींमध्ये १३ शतकातील संगमरवरी Arch Parikara, लक्ष्मी आणि विष्णू या देवतांची मूर्ती, भगवान शिवाची योद्धा रुपातील मूर्ती यांचा समावेश आहे. अशा तस्करी केलेल्या ६८० मूर्ती १३ देशांना परत करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button