मराठीतील पहिला विज्ञानपट ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

whistle blowing suit movie trailer
whistle blowing suit movie trailer
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानवी प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर तर नाहीय ना ? जगाच्या अंताचा काउंटडाउन सुरू झालाय का ? सृष्टीत अतिशय वेगाने अनाकलनीय बदल घडत आहेत. याचे पडसाद जगभर उमटत आहेत. या बदलांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांचे विश्लेषण करून उपाय सुचवण्याचा धाडसी प्रयत्न 'व्हिसल ब्लोईंग सूट' या चित्रपटात केला गेला आहे. जागतिक घडामोडींचा वेध प्रथमच, एका भारतीय चित्रपटात तोही आपल्या मराठी चित्रपटात घेतला जात आहे.

भूत, वर्तमान आणि भविष्याचा समग्र धांदोळा घेत प्रभावी उपाय सुचवणारा मराठीतील हा पहिला विज्ञानपट असून 'व्हिसल ब्लोईंग सूट' चित्रपट जागतिक चित्रपट महोत्सवात दमदार हजेरी लावण्यासाठी आता सज्ज झाला आहे. लेखक दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांच्या 'आई श्री भगवतीदेवी प्रॉडक्शन' या होम प्रोडक्शनची ही भव्य निर्मिती आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी धाडसी विषयाला हात घातला असून चित्रपट माध्यमात विलक्षण प्रयोग घडवून आणला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

हिंदी मालिका 'नोंकझोक' मधून बालकलाकार म्हणून काम करुन पुढे नाटक, मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री विशाखा कशाळकर या चित्रपटाद्वारे, मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटातील विशाखाची भूमिका अत्यंत आव्हानात्मक असून आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर तिने या भूमिकेत चांगला प्रभाव टाकला आहे.

चित्रपटाचे भारून टाकणारे संगीत, चित्रपटाची शैली, अनेक लेअर्समध्ये भाष्य करणारे दिग्दर्शन, कथेचा छाती दडपविणारा आवाका, वैज्ञानिक कसोटीवर खरी उतरणारी अनेक वर्ष रिसर्च करुन लिहिलेली संहिता ही या चित्रपटाची काही वैशिष्टये ट्रेलर पाहताच लक्षात येतात. गुरु ठाकूर, वामन तावडे, ज्ञानेश्वर मर्गज यांनी लिहिलेल्या गीतांना परिक्षित भातखंडे यांचे संगीत लाभले आहे.

या चित्रपटात मानव आणि पृथ्वीच्या परस्पर संबंधांचा वेध घेतला गेला आहे. त्याचवेळी मानवी उत्क्रांतीही मांडली आहे. एका अत्यंत क्लिष्ट विषयाला मनोरंजक कथेद्वारे मांडणाऱ्या या चित्रपटाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news