चंद्रपूर: बल्लारपूर वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला | पुढारी

चंद्रपूर: बल्लारपूर वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला

चंद्रपूर;पुढारी ऑनलाईन: येथील वनाधिकारी गुरूवारी (दि. २०) गस्त घालत असताना, तीन वर्षीय नर जातीचा पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. हा मृत वाघ बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील सातारा कोमटी कक्षच्या हद्दीत आढळला आहे. वाघाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसले, तरी या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे.

वनविभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील सातारा कोमटी कक्षक्रमांक ४३९ मध्ये काल गुरूवारी(दि.२०) वनाधिकाऱ्यांचा पथक गस्त घालीत होते. दुपारी बाराच्या सुमारास ३ वर्ष वयाचा, नर जातीचा पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती बल्लारपूर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी नरेश भोवरे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी भेट दिली. मृतास्थेतीली वाघाचे निरीक्षण केले असता, वाघाच्या संपर्णू शरीराचे अवयव सुरक्षित आढळून आले आहेत. यावेळी त्यांच्या समवेत क्षेत्र सहायक अब्बास पठाण, वनरक्षक प्रशांत झाडे, ज्योती अटेल, पायल शेडमाके यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर त्याच ठिकाणी वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.

नागपूर : लम्पीमुळे पूर्व विदर्भात ४४ जनावरांचा मृत्यू

मध्य चांदा वनविभागाचे वनसंरक्षक श्वेता बोड्डू, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी बंडू धोतरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक मुकेश भांदककर यांच्या मार्गदर्शनात वैद्यकिय अधिकारी डॉ. डी. पी. जांभूळे व डॉ. कुंदन पोडचलवार यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर वाघाचे अवयवाचे नमूने घेण्यात आले असून, ते रासायनिक विश्लेषणाकरिता नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर वाघाच्या मृत्यूचे कारण पुढे येणार असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिले आहे.

हेही वाचा:

Back to top button