पुढारी ऑनलाईन डेस्क : साजिद खान सध्या अडचणीत आहे. जेव्हापासून तिने 'बिग बॉस'मध्ये पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून अनेक अभिनेत्री आपला विरोध दर्शवत आहेत. साजिद खानचे कारनामे आपल्या वक्तव्यामधून देत आहेत. (Sajid Khan) अलीकडेच, MeToo च्या आरोपांमुळे साजिद खान चर्चेत आला होता. आता त्याने बिग बॉस १६ मध्ये स्पर्धक म्हणून एन्ट्री केली आहे. काही वर्षांपासून तो मोठ्या पडद्यापासून दूर होता. आता साजिद खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या एंगेजमेंट तुटण्याबद्दल, त्याच्या भूतकाळातील नात्याबद्दल अनेक वैयक्तिक रहस्ये उघड करताना दिसतो. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला आणखी ट्रोल केले जात आहे. (Sajid Khan)
साजिद खान सध्या 'बिग बॉस १६'मधील एन्ट्रीमुळे चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये पहिल्याच दिवसापासून साजिद खान एका पाठोपाठ एक मोठे खुलासे करत आहे. शोच्या प्रीमियरमध्ये त्याने सलमान खानसमोर कबूल केले की, त्याला त्याच्या स्टारडमचा अभिमान आहे. आता साजिद खानचा आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्वतःच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना दिसत आहे आणि गौहर खानसोबतचे लग्न मोडल्याबद्दलही तो बोलत आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सध्या साजिदची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या पूर्वीच्या नात्यांबद्दल सांगितले. व्हिडिओमध्ये, तो गौहर खानशी लग्न करणार होता, असे सांगितले. त्याचे अनेक तरुणींशी लिंकअप असूनही त्याने कधीही लग्न केले नाही, असेही तो म्हणाला. गौहरसोबत त्याची एंगेजमेंट असूनही तो अनेक मुलींना 'आय लव्ह यू' म्हणत असे, त्यांच्यासोबत हँग आउट करत असे. प्रत्येक मुलीला लग्नाचा प्रस्ताव द्यायचा आणि अनेक मुलीही त्याबाबत गंभीरही झाल्या आणि या अर्थाने ३५० लग्ने झाली असती, असे तो म्हणताना दिसतोय.
साजिदचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला खूप ट्रोल केले जात आहे. इंडस्ट्रीतील ९ महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या सर्वांनी चित्रपट निर्मात्यासोबत वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम केले आहे. स्वत:वरील आरोपांनंतर साजिदच्या हातातून 'हाऊसफुल ४'चा चित्रपट निसटला होता.
या जुन्या व्हिडिओमध्ये साजिद त्याच्या 'कोशिश से कामयाबी तक' शोमध्ये किरण जुनेजासोबत बोलताना दिसत आहे. जेव्हा होस्टने त्याला गौहरपासून विभक्त होण्याबद्दल विचारले तेव्हा साजिद म्हणाला, "त्यावेळी माझं चारित्र्य चांगलं नव्हतं आणि मी मुलींसोबत फिरायचो, खूप खोटे बोलत होतो."