Vaishali Takkar diary : वैशाली ठक्करच्या मृत्यूचे कारण बनला शेजारी, डायरीत काय काय लिहिलंय?
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सुसराल सिमर का' मध्ये दीपिका कक्कडच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या वैशाली ठक्करने आपले जीवन संपवले आहे. इंदोरमधील घरात तिने या जगाचा निरोप घेतला. ती २९ वर्षांची होती. (Vaishali Takkar diary) पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली होती. यामध्ये आधी सांगण्यात आलं होतं की, तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास द्यायचा. आता अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, यामध्ये शेजाऱ्याचे नावदेखील आहे. (Vaishali Takkar diary)
पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजता वैशालीने आपले जीवन संपवले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली. आता पोलिसांनी सांगितलं आहे की, वैशाली इंदौरमधील साई बाग कॉलोनी येथे राहत होती.
शेजारी बनला मृत्यूचे कारण
जेव्हा टीम तेथे पोहोचली तेव्हा त्यांना एक सुसाईड नोटदेखील मिळाली. यामध्ये लिहिलं होतं की, ती चिंतेत होती. तिचा शेजारी, ज्याचं नाव राहुल नावलानी आहे आणि पेशाने तो बिजनेसमन आहे. तिला तो त्रास द्यायचा. पोलिसांचं म्हणणं आहे की, शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून वैशीलीने आपली जीवनयात्रा संपवली.
एसीपी मोती उर रहमान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, राहुल, वैशालीचा शेजारी होता. आणि सुसाईट नोटवरून समजतं की, तो वैशालीला त्रास द्यायचा. याच कारणामुळे तिने इतके मोठे पाऊल उचलले.ती दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करणार होती आणि याच कारणामुळे राहुल तिला त्रास देत होता. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
फरार आहे शेजारी
पोलिसांनी सांगितलं की, राहुल विवाहित आहे आणि तो घराला कुलूप लावून फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. एसीपींनी सांगितलं की, वैशालीशी संबंधित अनेक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये तिची डायरीदेखील आहे. या डायरीमध्ये तिने डिप्रेशनचा उल्लेख केला आहे. त्याचसोबत काहींची नावंदेखील लिहिली आहेत.

