पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडमध्ये रिलेशनशिप आणि ब्रेकअप ही काही फार मोठी बाब नाही. येथे रोज नवी नाती जुळतात आणि तुटतातही. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री सारा अली खानने खुलेआम कार्तिक आर्यन आवडत असल्याची कबुली दिली होती. अनेकदा दोघेही एकत्र दिसले होते, पण नंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि ते वेगळे झाले. सध्या सारा अली खानचे नाव क्रिकेटर शुबमन गिलशी जोडले जात आहे.
सारा आणि कार्तिकचे ब्रेकअप झाले आहे काय? तसेच शुबमन साराच्या आयुष्यात कसा आला याबाबत चाहत्यांत उत्सुकता वाढली आहे. साराने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये कार्तिक आवडत असल्याचे मान्य करत त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर 'लव आज कल' चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कार्तिक आणि सारा यांच्यातील जवळीक वाढली. 'लव्ह आज कल' हा चित्रपट प्रदर्शित झाला असूनया दोघांमध्ये दुरावा वाढल्याचे दिसू लागले. त्यांच्या भेटी कमी झाल्या आणि दोघंही कामात व्यस्त झाले.