पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर ( Vaishali Takkar ) हिने इंदौर येथे गळफास घेवून जीवन संपवले. तिच्या या धक्कादायक निर्णयाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आता तिच्या मृत्यूचे कारण कारण समोर आलं आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है', 'ससुराल सिमर का' आणि 'मनमोहिनी' यांसारख्या मालिकामधून तिने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासोबत वैशाली सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय असून, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत होती. मृत्यूच्या आधी काही दिवसापूर्वी तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर बॉयफ्रेडसोबत बोलताना आणि त्याच्यासोबत ब्रेकअप झाल्याचे मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहेत. यावरूनच वैशालीचा ( Vaishali Takkar ) ब्रेकअप झाल्याने तिने गळफास घेवून जीवन संपवल्याचे बोलले जात आहे.
यातील एका व्हिडिओत वैशाली ठक्कर आणि तिची मैत्रिणीचाही राेल तिनेच केला आहे. यात पहिल्यांदा वैशाली बॉयफ्रेंडसोबतच्या नात्याला सहा महिने पूर्ण झाल्याची माहिती आनंदाने मैत्रिणीला देते; परंतु, तिची मैत्रीण तिला बॉयफ्रेंडची 'लॉयलिटी टेस्ट' करण्याचा सल्ला देते. यानंतर दोघीजणी प्लॅन करून तिची मैत्रीण एकांतात भेटण्यासाठी वैशालीचा बॉयफ्रेंड अक्षयला फोन करते. यानंतर अक्षय पहिल्यांदा माझ्या गर्लफ्रेंड असल्याचा तिला सांगतो. मात्र, लगेच तिला न सांगता जावूयात असे म्हणतो.
यानंतर वैशालीचा पार चढतो आणि अक्षयला ती कायमच बोलणं बंद करण्यास सांगते. याशिवाय आणखी एका व्हिडिओत तिला बॉयफ्रेंड रागाने बोलताना आणि तिची खिल्ली उडवताना दिसतोय. या सगळ्यावरून वैशालीने तिचे अक्षयसोबत ब्रेकअप झाल्याने जीवन संपवल्याचा तर्क लावले जात आहे. हा व्हिडिओ वैशालीच्या मृत्यूच्या काही दिवसापूर्वीचा आहे. हा व्हिडीओ तिने स्वत: च सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, वैशाली ठक्करने जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.
हेही वाचा :