Sai Tamhankar : नभातील शुक्राचे लोभसवाणे चांदणे🔥; ग्रीन साडीत सईचा मराठमोळा लूक | पुढारी

Sai Tamhankar : नभातील शुक्राचे लोभसवाणे चांदणे🔥; ग्रीन साडीत सईचा मराठमोळा लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीसह हिंदी बॉलिवूड विश्वात पदार्पण करणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट लूकसाठी चर्चेत असते. सध्या तिच्या आणखी एका ग्रीन साडीनं सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. सईच्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे.

सई ताम्हणकरने ( Sai Tamhankar ) तिच्या इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यात ग्रीन रंगाच्या सहावारी साडीतील फोटोशूट चर्चेत आले आहे. केसांची स्टाईल, लाईट मेकअप, रेड लिपस्टिक आणि मोठ्या इअररिंग्सने तिच्या सौदर्य खुलून दिसतेय. ग्रीन रंगाच्या साडीवर त्याच रंगाचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केला आहे. यावेळी सईच्या पाढीमागे पिवळ्या रंगाचा फडदा असल्याने तिने परिधान केलेल्या ग्रीन साडी खूपच ग्लॅमरस दिसतेय. या फोटोच्या कॅपशनमध्ये तिने एक ग्रीन आणि एक येलो रंगाचे हार्ट दिले आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय. यात एका युजर्सने ‘Lovely ek number looking gorgeous beautiful stunning sweet pretty and very very cute💚’, ‘tumhi khup chan distay ❤️❤️’, ‘Angel angel’, ‘Beautiful nicely love❤❤’, ‘सुंदर 😍’, ‘😍 Ooo…, Awesome pic 😍’, ‘Darjyaa kadak 👌👌’, ‘So hot looking 🔥🔥😍’, ‘😮सुपर 😋’, ‘Grace Personified 💚💚💚💚’, ‘So Pretty ❤️’, ‘नभातील शुक्राचे लोभसवाणे चांदणे’, ‘प्राजक्ताची मनमोहक सुगंधित कळी’, ‘🔥 Angaar’, ‘एक लाजरा न साजरा मुखडा 💚🥰’, ‘लाजवाब सुंदर दिसत आहेस तू 😍😍😍😍😍 घायाळ करणारी अदा आहेत तुझ्या ❤️❤️❤️❤️’, ‘Beautiful look and nice red lipstick aur smile.’, ‘stunning 💚’, ‘लवंगी मिरची…🔥’, यासारख्या अनेक कॉमोन्टस केल्या आहेत. तर दुसऱ्या एकाने ‘सईने खाद्यांवर काय लिहिलेय? ‘अशा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजींनी कॉमेन्ट बॉक्स भरला आहे.

‘दुनियादारी’, ‘बालक पालक’, ‘तू ही रे’, ‘धुराळा’, ‘गर्लफ्रेंड’, ‘पुणे ५२’, ‘क्लासमेट्स’ या मराठी चित्रपटात सई झळकली. यानंतर सईने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्नीशिखा’, ‘साथी रे’ आणि ‘कस्तुरी’ या मालिकांमध्ये तिने काम केलंय. यासोबत सईने बॉलिवूडमधील ‘गजनी’, ‘हंटर’, ‘मिमी’ सारख्या चित्रपटात अभिनयाची छाप पाडली. या सगळ्यासोबत सई सोशल मीडियावरदेखील हॉट फोटोज शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सईचे सोशल मीडियावर चांगले फॅन फॉलोइंग आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

Back to top button