Vaishali Takkar : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली ठक्‍करने जीवन संपवले

Vaishali Takkar
Vaishali Takkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रसिद्‍ध टीव्‍ही अभिनेत्री वैशाली ठक्‍कर ( Vaishali Takkar ) हिने इंदौर येथे गळफास लावून घेवून जीवन संपवले. तिने हे धक्‍कादायक कृत्‍य करण्‍यापूर्वी लिहलेली चिठ्‍ठी पोलिसांना सापडली आहे. वैशाली मागील एक वर्ष आपल्‍या इंदौर येथील घरीच होती. तिने घेतलेल्‍या टोकाच्‍या निर्णयामुळे मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Vaishali Takkar
Vaishali Takkar

Vaishali Takkar : 'ये रिश्ता क्या कहलाता है'मुळे मिळाली ओळख

वैशाली ठक्‍कर ही प्रसिद्‍ध टीव्‍ही अभिनेत्री होती. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्‍ये काम केले हाेते. तिने आपल्‍या कारकीर्दीची सुरुवात 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून केली होती. या मालिकेतील तिचे संजनाची भूमिका गाजली होती. यानंतर तिने आशिकी या मालिकेतही काम केले होते. 'ससुराल सिमर का' या मालिकेत तिला उदंड प्रसिद्‍धी मिळाली. सुपर सिस्‍टर, मनमोहिनी सीजन-२ या शोमध्‍येही ती सहभागी झाली होती.

वैशाली ठक्‍कर हिने टोकाचे पाउल का उचलेले, याचा उलगडा तिने जीवन संपविण्‍यापूर्वी लिहलेल्‍या चिठ्‍ठीमुळे होणार आहे. अद्‍याप पोलिसांनी या चिठ्‍ठीबाबत माहिती दिलेली नाही. याप्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे.

व्यापारी कुटूंबात जन्म

वैशाली ही मूळची उज्जैनमधील महिदपूरची . तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अल्पावधीत वैशालीने मनोरंजनविश्वात आपलं अस्तित्व निर्माण केलं होत. तिने ये रिश्ता क्या कहलाता है बरोबरचं आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष और अमृत या सारख्या मालिकेतही अभिनय केला आहे.   तिला 2017 मध्ये सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी ससुराल सिमर का मधील अंजली भारद्वाज या पात्रासाठी कलर्स गोल्डन पेटल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मालिकांबरोबरच तिने विवीध चित्रपटात तिने अभिनय केला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news