Isha Rikhi
Isha Rikhi

Isha Rikhi : रॅपर बादशाहला डेट करणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

Published on

पुढारी ऑनलाइन डेस्क : प्रसिद्ध रॅपर- गायक बादशहा त्याच्या रिलेशनशिपमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. गायक बादशहा हा एका पंजाबी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. बादशाहचे खरे नाव आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया असे आहे. तर कोरोनाच्या काळात बादशाह त्याच्या पहिल्या पत्नीपासून वेगळा झाला. त्यानंतर तो या अभिनेत्रीला ( Isha Rikhi ) डेट करत असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, रॅपर बादशाहाला डेट करत असलेल्या अभिनेत्री आहे तरी कोण? हे जाणून घेवूयात…

बादशहाचे त्याची पत्नी जस्मिनसोबत २०१९ मध्ये काही कारणास्तव मतभेद होण्यास सुरूवात झाली. यानंतर कोरोनाच्या काळात २०२० मध्ये बादशह आणि जस्मिनचे नात्यात दरी निर्माण होवून दोघांनी घटस्फोट घेतला. दोघांना जेसी ग्रेस मसिह नावाची मुलगी आहे. घटस्फोटानंतर जस्मिन मुलगीला घेऊन लंडनला गेली. तर कामानिमित्त बादशहा चंदीगड, दिल्ली आणि मुंबईमध्ये राहू लागला. याच दरम्यान बादशहाची एका पार्टीत चंदीगडची पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीची ( Isha Rikhi ) भेट झाली. यानंतर दोघेजण अनेक पार्टीत आणि डिनर डेटरव एकमेकांसोबत स्पॉट झाले. यानंतर दोघेजण एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.

याच दरम्यान बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीबद्दलची माहिती कुटुंबियांना दिल्याचेही वृत्त समोर आले आहे. परंतु, बादशहाने स्वत: याबबातची अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही. यामुळे चाहत्यांनी अनेक तर्क -वितर्क लावले आहेत.

कोण आहे ईशा रिखी

ईशा रिखीचा जन्म ९ सप्टेंबर १९९३ (वय २९) रोजी चंदीगडमध्ये झाला आहे. ईशा पंजाबी अभिनेत्रीसोबत एक मॉडेलदेखील आहे. सिप्पी गिल (Sippy Gill) सोबतच्या 'जॅट बॉइज पुट्ट जट्टन दे' (jatt Boys Putt Jattan De, 2013) या पंजाबी चित्रपटातून पडद्यावर पदार्पण केले आहे. यानंतर ती पंजाबी अभिनेता अमरिंदर गिलसोबत 'हॅपी गो लकी' (Happy Go Lucky) या चित्रपटात दिसली.

यानंतर ईशा २०१४ आणि २०१५ मध्ये 'मेरे यार कमिने' आणि 'व्हॉट द जॅट' मध्ये दिसली. यासोबत २०१६ मध्ये गिप्पी ग्रेवाल आणि अॅम्मी विर्क याच्यासोबत 'अर्दास' चित्रपटात तिने एका तरुणीची भूमिका साकारली होती. तर तिने 'नवाबजादे' या बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण केले आहे. पंजाबी अभिनेत्री म्हणून एक वेगळी ओळख आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Rikhi (@isharikhi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Rikhi (@isharikhi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Rikhi (@isharikhi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Rikhi (@isharikhi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Rikhi (@isharikhi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Rikhi (@isharikhi)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news