Adipurush : 'आदिपुरुष'साठी प्रभासने घेतले इतके कोटी, सैफला किती मिळाले? | पुढारी

Adipurush : 'आदिपुरुष'साठी प्रभासने घेतले इतके कोटी, सैफला किती मिळाले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभास आणि बॉलीवूड स्टार सैफ अली खान स्टारर चित्रपट ‘आदिपुरुष’च्या टीजरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. १ ऑक्टोबर रोजी श्रीराम नगरी अयोध्यामध्ये चित्रपट ‘आदिपुरुष’ चे टीझर लॉन्च करण्यात आला. (Adipurush) टीझर पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी टीझरवर टीका करणं सुरु केलं. तर काही युजर्सना या चित्रपटाचा टीझर आवडला. सोशल मीडियावर टीझरवरून अनेक मीम्सदेखील बनवले. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, प्रभास आणि सैफ अली खानने किती मानधन घेतले आहे? (Adipurush )

प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी प्रभासने घेतले इतके मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासला या चित्रपटासाठी ‘आदिपुरुष’मध्ये भगवान श्रीरामांच्या भूमिकेसाठी १०० कोटी रुपये मानधन मिळाले आहे. काही फॅन पेजवर हे सांगण्यात आले आहे की, प्रभासने चित्रपटासाठी १५० रुपये मागितले होते. प्रभास एक बिग बजेट चित्रपट अभिनेता आहे. त्याने चित्रपट ‘बाहुबली’साठीदेखील अधिक मानधन मागितले होते.

सैफ अली खानला मिळाले इतके कोटी

‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. त्यांनी या चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्यासाठी सैफ अली खानला १२ कोटी रुपये दिल्याचे म्हटले जाते. सैफ अली खान आणि प्रभासच्या मानधनात मोठी तफावत आहे. सैफ अली खानपेक्षा प्रभासने चित्रपटात जास्त काम केल्याचे चित्रपट निर्मात्यांचे म्हणणे आहे.

सीतेच्या भूमिकेसाठी इतके कोटी

या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनची भूमिका या चित्रपटात फारशी नाही. क्रिती सेनॉनने या भूमिकेसाठी ३ कोटी रुपये फी आकारली आहे.  लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या सनी सिंगने या चित्रपटासाठी दीड कोटी घेतले आहेत.

Back to top button