सिद्धार्थ-कियारा लवकरच विवाहबंधनात

सिद्धार्थ-कियारा लवकरच विवाहबंधनात

बॉलीवूडमधील सध्या एकाच जोडप्याची चर्चा सुरू आहे ते म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी! नुकतेच दोघे 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात येऊन गेले होते. या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली. नुकतेच सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितले आहे की, 'आता आमच्यात काही लपवण्यासारखे नाही'. आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे, अशी चर्चा आहे. हे जोडपे 6 एप्रिल 2023 रोजी विवाह बंधनात अडकतील. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात.

दोघांना बंधनात अडकण्याची घाई लागली आहे. त्यांचा विवाह सोहळा दिल्लीत पार पडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोघांच्या घराच्यांनी लग्नाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. दोघे पहिले कोर्टात लग्न करणार आहेत त्यानंतर नातेवाईक, पाहुण्यांसाठी स्वागत, समारंभ ठेवणार आहेत. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करू लागले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news