Sai Lokur : आळशी सईचा अचानक ब्ल्यू आऊटफिट (video) | पुढारी

Sai Lokur : आळशी सईचा अचानक ब्ल्यू आऊटफिट (video)

पुढारी ऑनालईन डेस्क : ‘बिग बॉस मराठी’ फेम मराठी अभिनेत्री सई लोकुरने ( Sai Lokur ) गेल्या वर्षी तीर्थदीप रॉय याच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्याच्यासोबत मालदीवच्या बीचवर व्हेकेशन एन्जॉय करताना दिसली. तेव्हापासून सईच्या सोशल मीडियावर एकपेक्षा एक हॉट फोटो व्हायरल होत आहेत. सध्या आणखी एका सईच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री शई लोकूर तिच्या व्हेकेशनचे नवनवीन फोटो शेअर करून चाहत्याच्यात सक्रीय राहत असते. सध्या तिने निळ्या
( ब्ल्यू) रंगाच्या आऊटफिटमधील काही फोटो आणि एक व्हिडिओ तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत सईने खास करून निळ्या रंगाचे मोराच्या पंखासारखे कानातील इयररिंग्स परिधान करून चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मोकळे केस, गालावर हास्य आणि मेकअपने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Thank you for gorgeous earrings 😍’. असे लिहिलं आहे.

शेअर झालेल्या व्हिडिओत पहिल्यादा सई थकलेली, आळशी आणि साध्या कपड्यात स्वत:चे डोळे चोळताना दिसतेय. परंतु, नंतर सगेच ती निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये एकदम ग्लॅमरस दिसतेय. या फोटोला पोझ देताना सईने कधी तिच्या कानावर तर कधी तिच्या केसांना हात लावला आहे. यासोबत ऑरेंन्ज रंगाच्या साडीतील आणि पांढऱ्या रंगाच्या अनारकलीमधील देखील फोटो पाहायला मिळतात. सगळ्याच फोटोंनी सईच्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ घातली आहे.

‘Awesome 🌹🌹🌹❤❤❤’, ‘सुंदर 💙💙’, ‘Cool❤️’, ‘Looking nice 🌹🌹🌹❤❤❤’, ‘Beautiful😍’, ‘Ohhh Wowwww 🤩🤩 Nice Earnings’, ‘Great look’, ‘Beautiful❤️❤️❤️😍😍😍😍’, ‘𝚂𝚞𝚙𝚎𝚛𝚋 💙💙’, ‘U funny megic👏❤️❤️❤️’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहे. यात एका युजर्सने तिला केस कट करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबत काही नेटकऱ्यांनी तिला व्हिडिओवर हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. आतापर्यत या व्हिडिओवर १५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. सईने गेल्या काही दिवसांत पती तीर्थदीप रॉयचा वाढदिवस थाटामाटात साजरा केलाय.

हेही वाचलंत का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

Back to top button