बिग बॉस मराठी 4 – Day 10 : प्रसाद म्हणतो-त्यांच्या-त्यांच्यात युनिटी नाहीये | पुढारी

बिग बॉस मराठी 4 - Day 10 : प्रसाद म्हणतो-त्यांच्या-त्यांच्यात युनिटी नाहीये

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे गेले उडत हे साप्ताहिक कार्य. या कार्यात हे विमान सदस्यांना घेऊन जाणार आहे. दुसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन पदाच्या उमेदवारीकडे. या कार्यामध्ये देखील सदस्यांची लागणार कसोटी. दुसऱ्या आठवड्यात कोणाला मिळणार कॅप्टन पदाची उमेदवारी आणि कोण बनणार घराचा कॅप्टन हे कळेलच. पण या कार्या दरम्यान सदस्यांमध्ये होत आहेत राडे आणि भांडणं. तर काही सदस्य समजूतदारपणा दाखवून माघार घेत आहेत. आणि याचविषयी चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये अक्षयचे म्हणणे आहे, “आपण समृद्धीचं कौतुक करूया. कारण तिने सगळ्यात पहिले निर्णय घेतला की, मी कॅप्टन झाले मी बाहेर जाते.

अपूर्वाने यशश्रीला सांगितले, “जे काही कार्यात होते ते तिथेच सोडून यायचं. कुठलं पण काहीपण असूदे. त्यावर तिचं काय म्हणणं आहे पाहुया आजच्या भागात. दुसरीकडे प्रसाद त्याच्या टीमशी बोलताना दिसणार आहे, “युनिटी अजिबात नाहीये… तर रुचिरा तिकडे टीमला सांगताना दिसते आहे.” युनिटी असणं खूप गरजेचं आहे, ती आहेच आणि ती असणारचं. पण आपण सगळेजण एका पेजवर असणे गरजेचे आहे. याचबरोबर यशश्रीचे टीमद्वारे कौतुक होणार आहे. समृद्धी म्हणाली, तू जे काय केलेस ना ती सगळ्यात मोठी स्टेप होती. अपूर्वा म्हणाली, तू झुकलीस नाहीस ते बेस्ट… हॅट्स ऑफ.”

Back to top button