Women’s Commission : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा ‘स्वाती मालिवाल’ यांना सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी | पुढारी

Women's Commission : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा 'स्वाती मालिवाल' यांना सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : Women’s Commission : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी देण्यात आली आहे.  त्यांनी महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप झालेल्या साजिद खानची दूरचित्रवाहिनीवरील ‘बिग बॉस’ कार्यक्रमातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. दिल्ली पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Women’s Commission : इन्स्टाग्रामवरून ही धमकी देण्यात आली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना शिक्षा द्यावी, असे मालिवाल यांनी बुधवारी सांगितले. साजिद खानच्या संदर्भात जेंव्हापासून प्रश्न उपस्थित केले. तेव्हापासून आपणास धमक्या दिल्या जात आहेत. मालिवाल पुढे म्हणतात की, साजिद खानला ‘बिग बॉस’ कार्यक्रमातून बाहेर काढण्याचे निर्देश द्यावेत, अशा स्वरूपाचे पत्र आपण माहिती आणि नभोवाणी मंत्र्यांना दिलेले आहे. तेव्हापासून धमकीसत्र सुरु आहे.
Women’s Commission : आमचे काम थांबविण्यासाठी हे केले जात आहे. यामागे जे लोक आहेत, त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे. खान याच्यावर दहापेक्षा जास्त महिलांनी लैंगिक अत्याचाराचा तसेच अश्लील व्यवहार केल्याचा आरोप आहे. असे असूनही एका प्रसिद्ध कार्यक्रमात सहभाग घेण्यास त्याला परवानगी देण्यात आली आहे. साजिद खान याची सखोल चौकशी करण्याचीही गरज आहे.
हे ही वाचा :

Back to top button