Kiara Advani : बर्थडेसाठी गेलेल्या कियाराच्या डीपनेक ड्रेसवर खिळल्या नजरा | पुढारी

Kiara Advani : बर्थडेसाठी गेलेल्या कियाराच्या डीपनेक ड्रेसवर खिळल्या नजरा

पुढारी आऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बॉलीवूड प्रोड्यूसर अश्विनी यार्डीचा बर्थडे बॅशचा आहे. या व्हिडिओत दोघे एकत्र सहभागी होताना दिसले. सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) – कियारा आडवाणी (Kiara Advani) यांची फ्रेंडशीप सर्वश्रुत आहे. बॉलीवूडच्या या क्यूट रूमर्ड कपलला नेहमी एकत्र टाईम स्पेंड करताना पाहिले जाते. त्याचसोबत बी-टाऊनमध्ये होणाऱ्या सर्व पार्ट्यांमध्ये कपल नेहमी एकत्र सहभागी होताना दिसतात. आताही बॉलीवुड प्रोड्यूसर अश्विनी यार्डीच्या बर्थडे पार्टीत पाहायला मिळाले. (Kiara Advani)

अश्विनी यार्डीच्या बर्थडे बॅशचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये बॉलीवूचे अनेक दिग्गज स्टार्स पार्टीत सहभागी झाले. पार्टीत शरद केळकर, कार्तिक आर्यन, अक्षय कुमार, सलमान खान, मसाबा गुप्ता, सलमान खानची बहिण अर्पिता खान, तिचा पती आयुष शर्मा, रितेश देशमुख आपल्या पत्नीसोबत जेनेलिया डिसूजासोबत सहभागी झाले होते. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणीने पार्टीत एकत्र हजेरी लावली. विशेष म्हणजे, कियाराच्या फॅशन स्टेमेंटवर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या.

विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थ-कियाराच्या एन्ट्रीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघे एकत्र कारमधून उतरतात आणि पार्टीत सहभागी होतात. पार्टीत सिद्धार्थ डेनिम जॅकेटसोबत ब्लॅक पँटमध्ये दिसला. कियाराने पुन्हा एकदा आपल्या फॅशन स्टेटमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर कियाराने गोल्डन स्कर्टसोबत व्हाईट रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. ती स्टनिंग दिसत होती. पार्टीत सहभागी होण्याआधी या कपलने पॅपराजींना पोझ देऊन फोटोशूट केले.

सिद्धार्थ-कियारा दीर्घकाळ डेटवर

सिद्धार्थ-कियारा एकमेकांना दीर्घकाळ डेट करत आहेत. दोघांनी आपले नाते जाहीर केलेले नाही. जेव्हा सिद्धार्थ अभिनेता विक्की कौशलसोबत करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण सीजन ७’ सहभागी झाला होता. त्यावेळी करणने सिद्धार्थला कियाराच्या फ्रेंडशीपवरून प्रश्न विचारला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button