

बीड; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील वरपगाव येथे विजेचा धक्का बसून २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संभाजी भक्ताजी बनसोडे असे त्याचे नाव आहे.
संभाजी आज सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर आंघोळ करून घरात जात हाेता. यावेळी पाण्याच्या मोटारचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक सहा महिन्याचा मुलगा आहे. बिट जमादार पोलीस नाईक राजू गुंजाळ घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवण्यात आला.