बीड : तिघींना सर्पदंश!, दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू, आईवर उपचार सुरु | पुढारी

बीड : तिघींना सर्पदंश!, दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू, आईवर उपचार सुरु

केज (बीड); पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील सोनेसांगवी नं. २ येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील दोन मुली व आईला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याने दोन्ही मुली दगावल्या असून आईवर उपचार सुरू आहेत.

या बाबतची माहिती अशी की, ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२:३० वाजण्याच्या दरम्यान सोनेसांगवी नं. २ (ता. केज) येथील दीपक साखरे यांच्या कुटुंबातील सौ. जयश्री दीपक साखरे (वय ३० वर्ष), कु. स्वप्नाली दीपक साखरे (वय ४ वर्ष), कु. स्वीटी दीपक साखरे वय (३ वर्ष) या तिघी मायलेकींना त्यांच्या घरात झोपलेल्या असताना विषारी साप चावला. त्यात स्वप्नाली साखरे व स्वीटी साखरे या दोन्ही चिमुकल्या जागीच गतप्राण झाल्या.

तर त्यांची आई सौ. जयश्री साखरे यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामाननंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश होऊन दोन चिमुकल्यांचा जीव गेला. ही अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.

सांस्कृतिक कला बाजार सप्ताह : कलाकारांकडून राज्‍य सरकारचा निषेध

Corona third wave : मुंबईत कोरोनाची तिसरी आलीय लाट

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

Back to top button