Avadhoot Gupte : मी तुमच्या गटाचा! शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत | पुढारी

 Avadhoot Gupte : मी तुमच्या गटाचा! शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : “रसिक मायबाप , बीकेसीवर (BKC) काल दसऱ्यानिमित्य झालेल्या मेळाव्यात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंच्या आमंत्रणानुसार ‘एक गायक म्हणून’ दोन गाणी सादर केली! या पार्श्वभूमीवर गैरसमजातून काही प्रसारमाध्यमांनी मी “शिंदे गटात प्रवेश ” केल्याच्या बातम्या दिल्या.” अशी पोस्ट करत गायक अवधुत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी एक खुलासा केला आहे. वाचा नेमके काय आहे प्रकरण.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेला आणि  शिवसेनेची खास परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमीच चर्चेतील विषय आणि कायम लक्षात राहणारा. यावर्षीचा दसरा मेळावा तसा चर्चेतील विषयच राहिला आहे. कारण शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले आहेत. एक दसरा मेळावा तो ठाकरे गटाचा शिवाजी पार्क, मुंबई येथे आणि दुसरा बीकेसी मैदान, बांद्रा, मुंबई येथे शिंदे गटाच्या शिवसेनेचा झाला. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावे दोन झाले आहेत. या दोन्ही गटाच्या दसऱ्या मेळाव्याला अनेक दिग्गज लोकांनी आपली हजेरी लावली होती. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला  अनेक कलाकारांनी आपली उपस्थित लावली होती. यामध्ये अवधूत गुप्ते, (Avadhoot Gupte) स्वप्निल बांदोडकर,  प्रसाद ओक,  प्रविण तरडे, शरद पोंक्षे,  नंदेश उमप होते. या मेळाव्यात गायक अवधूत गुप्ते यांनी शिवसेनेचं नवं  गाणं गायलं होत. यावरुन चर्चा रंगू लागल्या. यावरुन अवधूतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन खुलासा केला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,
Dasara Melava
Dasara Melava

Avadhoot Gupte : मी तुमच्या गटाचा ! 

मी तुमच्या गटाचा! रसिक मायबाप, बीकेसी (BKC) वर काल दसऱ्यानिमित्य झालेल्या मेळाव्यात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंच्या आमंत्रणानुसार ‘एक गायक म्हणून’ दोन गाणी सादर केली! या पार्श्वभूमीवर गैरसमजातून काही प्रसारमाध्यमांनी मी “शिंदे गटात प्रवेश ” केल्याच्या बातम्या दिल्या. माझ्याकडे अद्याप कोणत्याही पक्षाचं साधं प्राथमिक सदस्यत्व पण नाही. तसेच मी कोणत्याही पक्षात किंवा गटात प्रवेश केलेला नाही. तुम्ही माझा प्रेक्षकवर्ग, चाहते , फॉलोवर्स हे माझे मायबाप आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टीच स्पष्टीकरण देणं हे मी माझं उत्तरदायित्व समजतो! मी ह्या आधीही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरून माझी कला सादर केल्याचे तुम्ही जाणताच!


माझ्या लेखी हा विषय इथेच संपला!
अवधूत गुप्ते यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांच्या संमिश्र कॉमेंटस येत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button