पुढारी ऑनालाइन डेस्क : Fake Job Racket " नुकताच माझा वाढदिवस झाला. माझे कुटुंबिय म्हणाले हा माझा दुसरा जन्म आहे! मी आणि माझ्या कुटुंबियांनी आता पुन्हा भेटण्याची आस सोडून दिली होती. पण मी कसाबसा सुटून भारतात पोहोचलो," अशी 'आपबिती' बनावट जॉब रॅकेटमधून सुटलेल्या पीडित तरुणाने सांगितली.
Fake Job Racket गेल्या काही दिवसांपासून विदेशात चांगल्या उच्च पगाराच्या नोकरीच्या आमिषाने भारतीयांना गंडवून नंतर त्यांना बंधक बनवून जबरदस्तीने काम करून घेण्यात येत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. फेक चिनी कंपन्या असे जॉब रॅकेट चालवत असून यामध्ये शेकडो भारतीय तरुण अडकले आहेत. या घटना समोर आल्यानंतर भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने तरुणांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एका माहितीनुसार म्यानमार येथून आतापर्यंत तब्बल 43 लोकांची सुटका केली आहे. या बनावट जॉब रॅकेटमधून सुटका झालेल्या एका तरुणाने त्याच्यावरील आपबिती सांगितली आहे. एनडीटीव्ही हिंदी वृत्तवाहिनीने संबंधित पीडित तरुणाची मुलाखत घेऊन याबाबतचे वृत्त दिले आहे.
Fake Job Racket म्यानमारमधून परत आलेल्या 43 वर्षीय हरीष कुमार ने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. तो म्हणाला नुकताच माझा वाढदिवस होऊन गेला. माझ्या कुटुंबीयांनी हा माझा दुसरा जन्म आहे असे सांगितले. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी मी परत येईन याची आस सोडून दिली होती. मात्र दैव कृपेने मी बचावलो.
Fake Job Racket हरीष म्हणाला, मी दुबईमध्ये नोकरीच्या शोधात गेलो होतो. एका बनावट चीनी कंपनीच्या जाळ्यात अडकून मी थायलंडला पोहोचलो. त्यांनी मला सांगितले होते की जास्त पगार सोबत राहण्यासाठी घर कार या सर्व गोष्टी दिल्या जातील. मात्र, मी जेव्हा थायलंडला पोहोचलो तेव्हा मी स्तब्ध झालो. तिथे आम्हाला अगदी तुरुंगातील बंदी केलेल्या कैद्यांप्रमाणे वागणूक दिली जात होती.
Fake Job Racket आमच्याकडून बंदूकीच्या धाकावर जवळपास 16-17 तास काम करून घेतले जायचे. सोबतच आम्हाला जेवणही दिले जात नव्हते. आम्हाला 10 किलोमीटर पळवले जात होते. मी तिथून एक व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये परिस्थितीचे शुटिंग केले होते. आम्ही जेव्हा भारतात परतण्यासाठी प्रयत्न करायचो तेव्हा आम्हाला जोरजोरात मारझोड करण्यात येत असे. इतकेच नव्हे तर विजेचे शॉक देण्यात येई. तिथे माझ्यासारखेच आणखी भारतीय अडकले होते. सर्व भारतीयांसोबत जनावराप्रमाणे व्यवहार केले जात होते. काहींना तर हथकड्या घालून खोलीत डांबून ठेवले जात असे.
Fake Job Racket माझी अवस्था माहिती झाल्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली पण काही उपयोग झाला नाही. म्यानमारच्या सैन्याने हरीष सारख्या 17 लोकांना वाचवले आणि थायलंडमध्ये सोडून दिले. मात्र तेथील पोलिसांनी त्यांना अवैध रुपात बॉर्डर पार करण्याच्या आरोपात तुरुंगात डांबले. हरिष म्हणाला की तो 4000 थाई बक इतका दंड भरून त्याने तुरुंगातून सुटका करून घेतली आणि एका भारतीय एजंटच्या मदतीने 29 सप्टेंबरला भारतात परतला.
Fake Job Racket दरम्यान, या घटना समोर आल्यानंतर भारत सरकारने अडकलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी पावले उचलली आहेत. आतापर्यंत 43 जणांची सुटका करण्यात आली आहे. अन्य तरुणांच्या सुटकांचे प्रयत्न सुरू आहे. MEA स्पॉक्स अरिंदम बागची, यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. म्यानमारमध्ये बनावट जॉब रॅकेटमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या प्रकरणाचा आम्ही सक्रियपणे पाठपुरावा करत आहोत. जवळपास 32 भारतीयांची आधीच सुटका करण्यात आली होती. आणखी 13 भारतीय नागरिकांची आता सुटका करण्यात आली आहे आणि तामिळनाडूला पोहोचले आहे.
Fake Job Racket परराष्ट्र मंत्रालयाकडून एडवायजरी जारी करण्यात आली आहे. तरुणांनी अशा रॅकेटमध्ये अडकू नये यासाठी त्या देशातील भारतीय दुतावासाकडून कंपनी व अन्य माहिती पडताळून घेण्याचे सांगण्यात आले आहे.